लातूर । प्रतिनिधी ( रवि बिजलवाड ): आज दि.१४/०८/२०२० रोजी रुग्ण हक्क संघर्ष समितीच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक शेटे निवास बार्शि रोड लातूर येथे घेण्यात आली. या बैठकीत समितीचे पुढील कार्याचे नियोजन करण्यात आले.
त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षाची निवड करणे, जिल्हा कार्यकारिणीची आखणी करण्यात आली तसेच कोअर कमिटीच्या सदस्यांचा सर्वानुमते लातूर जिल्हा अध्यक्ष पदी हनमंत नागनाथराव गोत्राळ यांची निवड घोषित करुन नियुक्ती पत्र देऊन कार्यरत करण्यात आले व त्यांचे सर्वांनी अंंभिनदन केले. जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाल हा एक वर्षाचा असेल. या बैठकीस समितीचे ॲड.निलेश करमुडी, प्रशांत चव्हाण, संजय कुमार सुरवसे,मिनाक्षिताई शेटे, गंगाधर विसापुरे आदि मान्यवर उपस्थित होते.

