हिंगोली । प्रतिनीधी (विश्वनाथ देशमुख):
दि.१७,हिंगोली जिल्ह्यातील औंढा(नागनाथ)तालुक्यातील गोजेगाव येथील शेतकरी दि.१६ आँगस्ट रविवार रोजी सायंकाळी गुरे चारून घराला जातांना पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेला होता काल पासून शोध मोहीम सुरू होती आज दि.१७ आँगस्ट सोमवार रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास तब्बल २२ तासांनी त्या शेतकर्‍याचा मृतदेह सापडला आहे.



गुलाब साहेबराव खिल्लारे वय (४०) वर्ष असे या मयत शेतकऱ्यांचे नाव आहे ते रविवारी संध्याकाळी गुरे चारूण घरी येत होते गाव जवळच्या ओढ्याला पूर आला होता पुराच्या पाण्यातून येत असतांना खिल्लारे यांचा पाय घसरून ते पाण्यात वाहून गेले त्यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना पोहता आले नाही ग्रामस्थांनी काल संध्याकाळपासूनच शोध मोहीम चालु केली होती आज सकाळी गावात रेक्सीयु टीमदाखल जाली आणि त्या टीमला तब्बल बावीस तासांनी खिल्लारे यांचा मृतदेह सापडला आहें गेल्या आठ दिवसा पासून संततधार पाऊस असल्यामुळे खिल्लारे यांना शोधण्यासाठी खुप अडथळे निर्माण झाले खिल्लारे यांचा मृतदेह आढळून आल्या नंतर त्यांच्या घराच्याकडून एकच टाहो फोडला व पूर्ण गावावर शोककळा पसरली आहें शव विच्छेदनासाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया चालु आहे घरातील कर्ता व्यक्ती गेल्या मुळे गावावर शोककळा पसरली आहें