केज | तालुका प्रतिनिधी (प्रकाश मुंडे):-
कोरोनामुळे उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात मुलांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून घर बसल्या अभ्यास देण्याचे प्रयत्न विविध पातळ्यावरून होत आहेत. ऑनलाईन ही संकल्पना संचारबंदीच्या काळात रुजविली जात आहे .ही पध्दत विद्यार्थी वर्गासाठी चांगली असली तरी ऑफलाईन विद्यार्थी वर्गांचे काय? ही समस्या अद्यापही अनुत्तरित आहे .
आणि वीज पुरवठा पुरेसे नेट दिसण्या ऐकण्या मधील अस्पष्टता , अशा अनेक समस्या आॅनलाईन शिक्षणात उद्भवत आहेत.
विविध महाविद्यालय, विद्यालयाच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षिका भ्रमणध्वनीच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन करीत आहेत. सध्याच्या संचारबंदीच्या काळात वर्क फ्रॉर्म होम, स्टडी फ्रॉर्म होम, इ -लर्निंग या संकल्पना रूजविल्या जात आहेत.
संकटकाळी बालकांचा शिक्षण हक्कांचा विचार यातून या गोष्टी विकसित झाल्या आहेत. तंत्रज्ञानाच्या जोडणीआधारे अनेक विद्यार्थी या उपक्रमात समाविष्ट झाले आहेत .मात्र ऑफलाईन विद्यार्थी काय करणार ? ही समस्या मोठी असून ती अद्यापही अनुत्तरीतच आहे. संचारबंदीचा काळ दिवसेंदिवस वाढत आहे . या पुढेही वाढला तर शिक्षणाचा,अभ्यासाचा नव्याने विचार करण्याची संधी या निमित्याने मिळणार आहे. शिक्षण संस्थांना तसेच जिल्हा परिषदांना ती करावी लागणार आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांनी अॅंड्राइड मोबाईल कोठून आणायचे. व मोबाईल उपलब्ध झाला तर त्याला रिचार्ज करायला पैशाची गरज कसी भागवायची ही पण फार मोठी समस्या आहे. या सर्व विषयावर वेळीच मार्ग निघणे देखील अतिशय आवश्यक आहे. जिल्हा परिषद व शैक्षणिक संस्थांनी या वर वेळीच मार्ग काढून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

