येथील गुन्हेगारीवर वचक बसावा,अशी जिल्हावासियांना आशा..!!
सावळीविहीर( प्रतिनिधी) :
सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नुकतीच अहमदनगरला पोलीस अधिक्षक म्हणून बदली झाली असून ते एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखलॆ जातात. अहमदनगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांची बदली कोठे झाली याचे अद्याप ठिकाण निश्चित नसले तरी महाराष्ट्र राज्यातील एकूण 33 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने नुकताच शासन आदेश क्रमांक आयपीएस 20 20 प्र, क्रमांक 192 पोल/1 नुसार राज्यातील एकूण 33 पोलीस अधीक्षक व पोलीस उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये पुण्याला अभिताभ गुप्ता हे पोलिस आयुक्त म्हणून बदलून आले आहेत. तर अहेरी (गडचिरोली) चे मोहितकुमार गर्ग ,अप्पर पोलीस अधिक्षक, यांची रत्नागिरीला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.तसेच मुंबई येथील गुन्हे विभागाचे पोलीस उपायुक्त विक्रम देशमाने यांची सिंधुदुर्गला एसपी म्हणून बदली करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे एस आर पी नवी मुंबई चे समादेशक राजेंद्र दाभाडे यांची नाशिक ग्रामीण ला पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे . त्याच प्रमाणे रत्नागिरी चे पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांची जळगाव जिल्ह्याला पोलीस अधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे तसेच अभिनव देशमुख यांचे कोल्हापूर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे ग्रामीण ला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. तसेच सिंधुदुर्गचे पोलिस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम यांची सांगली येथे पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना करण्यात आली आहे.
तसेच गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची कोल्हापूर ला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे .अशा एकूण सुमारे 33 पोलीस अधिकाऱ्यांच्या राज्यात गृहविभागाने बदल्या केल्या आहेत व तसे आदेश पारित केले असून त्यांनी त्वरित आपल्या बदलीच्या ठिकाणी कार्यरत होण्याचेही आदेश पारित करण्यात आले आहेत.
यामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज कुमार पाटील यांचे अहमदनगरला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली असून मनोज पाटील हे कर्तव्यदक्ष व आयपीएस अधिकारी आहेत, ते सोलापूरला पोलीस अधीक्षक असताना त्यांनी तेथील गुन्हेगारी टोळ्या व अवैध धंदे यावर मोठे जरब बसवली होती, त्यामुळे मनोज कुमार पाटील हे आता अहमदनगर सारख्या महाराष्ट्रात सर्वात क्षेत्रफळाने मोठे असलेल्या व राज्यात राजकीय क्षेत्रात दबदबा असणाऱ्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक म्हणून येत आहेत. त्यांच्यापुढे अहमदनगर जिल्ह्यात मोठे आव्हानही आहे.अहमदनगर जिल्ह्यात क्षेत्रफळाचा विस्तार मोठा असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी सध्या सुरू आहे, जिल्ह्यात विशेषता शहरात व धार्मिक क्षेत्रांच्या शिर्डी शनिशिंगणापूर अशा शहरांमध्ये व परिसरात अवैध धंदे ही मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत.
जिल्ह्यात वाळू तस्करी, तसेच अवैध दारूधंदे मटका ,जुगार, जुगाराचे मोठे क्लब, आदी अवैध व्यवसाय जिल्हयात मोठ्या प्रमाणात सुरू आहे तसेच चोऱ्या, तसेच नगर मनमाडला असणाऱ्या बायपास रस्त्यांवर जड वाहतूक लुटणार्या टोळ्या, भुरट्या चोऱ्या ,यांचे प्रमाण वाढले आहे.शिवाय अहमदनगर जिल्ह्यात काही पोलिस स्टेशन असे आहेत की तेथे प्रभारी राज सुरू आहे, त्यामुळे येथे या पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध धंद्यांना मोठ्या ऊत आहे.या सर्वांचे आता मनोज कुमार पाटील यांना नवीन पोलीस अधीक्षक पदाचा येथे पदभार स्वीकारताना मोठे आवाहनही आहे.


