गडचिरोली ता.२५ :- गोंडवाना विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी संघटनेने आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी २४ सप्टेंबर पासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी हे आंदोलन आजही दुसऱ्या दिवशी सुरू होते.
सातवा वेतन आयोग लागू करावा, आश्वासित प्रगती योजना लागू करावी तसेच पाच दिवसाचा आठवडा लागू करण्यात यावा, या प्रमुखसह एकूण दहा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात गोंडवाना विद्यापीठाचे बहुतांश अधिकारी व कर्मचारी सहभागी झाल्याने विद्यापीठाचे प्रशासकीय कामकाज प्रभावित झाले आहे.

