रुईछत्तीसी । प्रतिनिधी :
वाढत्या कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर नगर तालुक्यातील सर्व विद्यार्थीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आता न्यु आर्टस काॅलेज अ.नगर व बाणेश्वर महाविद्यालय बुर्हानगर अशा दोनच महाविद्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. तसे आँनलाईन मध्ये पर्याय शिक्षण विभागाने उपलब्ध केले‌ आहे. जर शिक्षण विभागाने ज्या त्या महाविद्यालय मध्ये परीक्षा सेंटर उपलब्ध करून दिले असते तर ते सोयीस्कर झाले असते. अशावेळी राज्य सरकार प्रशासन सांगत आहे कि सामाजिक अंतर पाळा,गर्दी टाळा, नियम पाळा,एकमेकांच्या संपर्कात येऊ नका, मग हे गर्दी होण्याचे  (परीक्षा)नियोजन कसे केले..?

 कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे परीक्षा ज्या त्या काॅलेज सेंटर वर होणे गरजेचे असताना देखील नगर तालुक्यातील सर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आता शहराच्या ठिकाणी नाईलाजाने परीक्षा देणे भाग पाडले आहे.  ग्रामिण भागातील पालकांमध्ये आणि विद्यार्थी मध्ये आता कुरबुरी वाढत चालली आहे. पेपर द्यायचे का नाही, पालक विद्यार्थीना शहरात पाठविण्यास तयार नाहीत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे परीक्षा न देणेच विद्यार्थी व पालकांची मानसीकता झाली आहे.  मग राज्यभरात हजाराच्या वर परीक्षा सेंटर असतानाही देखील संपुर्ण राज्यातील अवघे ४४ महाविद्यालय परीक्षा सेंटर म्हणून  कसे निवडले ?

अंतिम वर्षाच्या परीक्षा देण्यासाठी आता शहरात जावं लागणार या चिंतेत पालक वर्ग व विद्यार्थी आहेत.
या परिक्षा मुळं महाविद्यालय सेंटर च्याच ठिकाणी घ्याव्यात अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत. परीक्षा केंद्र निवडण्याचा अंतिम दिनांक २६ सप्टेंबर आहे. या अंतिम वर्षाच्या  पदवी परीक्षा सेंटरचा गोंधळा बाबत‌ जनता कला व विज्ञान महाविद्यालय रुईछत्तीसी यांनी संबंधित विभागाशी पत्र व्यवहार करून रुईछत्तीसी महाविद्यालय मध्ये परीक्षा घेण्याचा पर्याय द्यावा अशी मागणी केली आहे.