गडचिरोली ता.२:-  जिल्हयात आज १० जण कोरोनामुक्त झाले असून  त्यांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली येथील ३, धानोरा येथील ४ सीआरपीएफ, एटापल्ली २, कुरखेडा १ असे एकूण १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

 १७ नवीन कोरोना बाधितांमध्ये एटापल्ली येथे ७ रुग्ण आढळले यामध्ये हेडरी येथील १ जवान व त्याची पत्नी तसेच स्थानिक १ व त्यांच्या संपर्कातील ४ जण कोरोना बाधित आढळून आले. चंद्रपूर वरून आलेला आरमोरी येथील १ जण, गडचिरोली येथे एकूण ५ कोरोना बाधित आढळले. यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील ३ रूग्ण, नागपूरहून आलेला १ स्थानिक व १ रुग्णालयातील नर्स यांचा समावेश आहे. चामोर्शी येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील १ जण, धानोरा येथील कोरोना बाधिताच्या संपर्कातील २ तर वडसा विसोरा १ एसआरपीएफ जवान असे आज एकूण  १७ कोरोना बाधित आढळून आले.

यामुळे जिल्हयातील सक्रिय कोरोना बाधितांची संख्या २९९ झाली असून एकुण बाधित संख्या ११९६ झाली आहे. आत्तापर्यंत एकूण ८९६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.