प्रतिनिधी । सचिन येडगे :
तुळजापूर : श्री शिव मित्र गणेश मंडळ वडगाव देव च्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 30 दात्यांनी रक्तदान केले. सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे यामुळे रक्ताचा तुटवडा पडल्यामुळे तुळजापूर तालुक्यातील वडगांव देव येथील श्री शिव मित्र गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर घेतले, याचे उद्घाटन गावचे सरपंच नागेश काळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पोलीस पाटील सौ. कल्पना ताई मस्के युवा नेते नीलकंठ कोरे,सचिन राजमाने, पवन पाटील सरपंच बारूळ शहाजी सुपनार आदी उपस्थित होते. या रक्तदानाला प्रतिसाद देत 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री शिव मित्र गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद राजमाने पाटील,नितीन राजमाने ,प्रताप पाटील,बाबुराव काळेकर, आनंद राजमाने,पोपट गायकवाड, मनोज देवकते,संदीप कुंभार,गणेश तोंडवळे यांनी रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी यांनी पुढाकार घेतला.

