गडचिरोली ता.२६:- जिल्हात आज चामोर्शी तालुक्यातील घोट येथील ३० वर्षीय तरूणाचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे तर नव्याने ४४ कोरोना बाधित आढळून आले असून ५५ रूग्णाने कोरोनावर मात केली आहे.

नवीन ४४ कोरोना बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १३ जनांचा समावेश आहे, अहेरी ६, आरमोरी ९,  चामोर्शी ७, कोरची ३, कुरखेडा २ व वडसा ३ जणांचा समावेश आहे. तर वेगवेगळया तालुक्यातील ५५ जण कोरोनामुक्त झाले आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील ३१ जणांचा समावेश आहे. इतर तालुक्यातील अहेरी १, आरमोरी ३, भामरागड ३, चामोर्शी ३, धानोरा ३, मुलचेरा ३, सिरोंचा १ व वडसा ७ जणांचा समावेश आहे.

जिल्हयात आज सक्रिय कोरोना बाधिताची संख्या ६१२ झाली आहे. आत्तापर्यंत एकुण बाधित २४१९ रूग्णांपैकी १७९१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.