चाळीसगाव। प्रतिनिधी (मंगलसिंग राजपूत):
कोरोना महामारी व निसर्गचा लहरीपणामुळे परेशान व अडचणीत असलेल्या गाव खेडी.वाडयावर राहणाऱ्या गरीब व होतकरु विध्यार्थी मोठया शहरात जावुन तेथे राहुन आपला अभ्यासचा खर्च पुर्ण करु शकत नाही. आर्थिक परिस्थीती व त्यात आणखी भर म्हणजे कोरोना महामारी, त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब समाज बांधवावर खुप मोठे संकट उदभवलेले आहे.
गरीब समाज बांधव शहरात येवुन हा खर्च उचलू शकत नाही ही खंत आपल्या राजपूत समाजातील सुशिक्षित मंडळीच्या लक्षात आली... त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणजे गावातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या होतकरु व हुशार समाज बांधवासाठी अभ्यासिका निर्माण करुन सुरू करणे.... राजपूत / परदेशी सामाजिक प्रतिष्ठाणचे पदाधीकारी, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व गावकरी मंडळी यांच्या त्रिवेणी संगमातून नविन उपक्रम राबविला जातो तो म्हणजे गावातच "अभ्यासिका " निर्माण करुन त्याना तेथेच स्पर्धा परीक्षांचा लागणारे पुस्तके / नोटबुक रजिस्टर उपलब्ध करुन देणे.
आज दी, 27.O9 2O2O रविवार सकाळी अकरा वाजत्ता.कृष्णापूरवाडी ( कोलठानवाडी ) ता. जि. संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे ग्रामस्थ मंडळीनी आर्थिक नियोजन करुन भव्य शहरात असणाऱ्या अभ्यासिका सारखी सुसज्ज अभ्यासिका निर्माण केली... हया अभ्यासिकाला राजपूत / परदेशी सामाजिक प्रतिष्ठानचे पदधिकारी व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना प्रदेश मीडीया प्रभारी व प्रवक्ता श्री केशरसिंह नागलोत यांच्या संयूक्त सहभागातुन विस हजार रु. ( 20,000 ) किंमतीची पुस्तके व नोटबुक / रजिस्टर उपलब्ध करुन देण्यात आली... आणि आज कृष्णापूरवाडी ग्रामस्थ मंडळी, राजपूत / परदेशी सामाजिक प्रतिष्ठानचे सर्व पदधिकारी व श्री केशरसिंह नागलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमीत महाजन ( IAS UPSC Rank 214) नविन निवड झालेले तहसिलदार (MPSC) रवि सतवन ( राजपूत ) यांच्या हस्ते थाटात शानदार कार्यक्रम घेवुन "श्रीगणेशा अभ्यासिका " लोकार्पण सोहळा पार पडला.. जय मॉ भवानी जय जय राजपूताना; केशरसिंह नाग लोत प्रदेश मीडिया प्रभारी / प्रवक्ता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुखदेवसिंह दादा गोगामेडी टीम भारत..आदींचा या कार्यक्रमात सहभाग होता.

