shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी एक्सप्रेस च्या बातमीची पुणे विद्यापीठाने घेतली त्वरीत दखल..!!



नगर । प्रतिनिधी (शिवा म्हस्के) :
पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा नगर तालुक्यातील सर्व विद्यार्थी परीक्षा सेंटर न्यु आर्टस अँड कॉमर्स काॅलेज अहमदनगर व बाणेश्वर महाविद्यालय बुर्हानगर अशा दोनच ठिकाणी सर्व विद्यार्थीं चे आँनलाईन साईटवर उपलब्ध होते.यात तिसरा चौथा पर्याय उपलब्ध नव्हता हि अडचण फक्त एका तालुक्या पुरती नव्हती तर ती संपूर्ण राज्यात होती.


या समस्येची गांभिर्य लक्षात घेऊन प्रहारचे जिल्हाअध्यक्ष विनोद परदेशी व जनता महाविद्यालय प्राचार्य डॉ.सुरेश बाबर यांनी जनता महाविद्यालय रुईछत्तीसी ता.नगर  हे‌ परिक्षा सेटर म्हणून उपलब्ध करावे. अशी मागणी केली होती. याची दखल शिर्डी एक्स्प्रेस नी घेऊन बातमी स्वरुपात तात्काळ प्रसिद्ध केली होती. त्यानंतर  शिडीॅ एक्स्प्रेस बातमी ची‌ दखल पुणे विद्यापीठ परीक्षा नियंत्रक विभागाने घेतल्याने .त्या दोन ऐवजी चार महाविद्यालय मध्ये परीक्षा घेण्यास मान्यता दिली. बातमी च्या माध्यमातून कोरोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे परीक्षा घेणे शहराच्या ठिकाणी कसे गुंतागुंतीचे आहे हे समाजा समोर "शिर्डी एक्स्प्रेस" समोर आणले व प्रशासनाच्या लक्षात हिच गोष्ट आल्याने त्यांनी आँनलाईन परीक्षा सेंटर निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून दिले. यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. 

जर शहराच्या ठिकाणी सहा दिवस पेपर देण्याची वेळ आली असती तर कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. विद्यार्थी आणि पालकांनी  परिक्षा न देण्याचा टोकाचा पर्यय देखील निवडला होता. या गोष्टी ला शिर्डी एक्सप्रेस च्या माध्यमातून  कुठेतरी वाचा फुटली आणि सर्व काही सोईस्कर झाले. त्यामुळे विद्यार्थीनी आणि पालकांनी  शिडीॅ एक्स्प्रेसच्या बातमीने आम्हाला खरा न्याय मिळाला. त्यामुळे आम्ही आपले खुप खुप धन्यवाद मानतो असे विद्यार्थ्यांनी शिर्डी एक्स्प्रेसच्या प्रतिनिधी शी  मनमोकळे पणाने बोलतांना सांगितले.
close