shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा समाजाचे सेनगांव तहसिलवर २९ सप्टेंबर मंगळवार रोजी ढोल बजावो आंदोलन..!!



हिंगोली । प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.२७,सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने हे आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सेनगांव तालुका सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सेनगांव तहसिलवर ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार असल्याचे सकल मराठा समाजाकडुन सांगण्यात आले. 


सर्वाच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असुन याच परीस्थितीत राज्य शासनाने पोलीस भरती काढली त्यामुळे मराठा समाजातील युवकांचे नुकसान होणार आहे.यामुळे या सरकारने कुठल्या ही परिस्थितीत समाजाला यापुर्वी दिलेले आरक्षण कायम ठेवावे या मागणीसाठी राज्यभर मराठा समाज बांधव लढा देत आहेत.याच अनुषंगाने सेनगांव तहसिलवर दि.२९ सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता ढोल बजावो आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनात सेनगांव तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी सहभागी होऊन आपला रोष व्यक्त करावा.

या आंदोलनाला आप्पास्वामी प्रवेशव्दारापासुन सुरुवात होणार आहे.कोरोनाचे संकट कायम असल्याने शासकीय नियमाचे पालन करुन प्रत्येकाने तोंडाला मास्क व सोबत सँनिटायझर सोबत घेऊन मराठा समाजातील सर्व राजकीय पक्षाचे ‌‌लोकप्रतिनिधी,पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी,डाँक्टर,व्यापारी,तरुण,पत्रकार,वकील सर्व समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सेनगांव तालुका सकल मराठा समाजाकडुन करण्यात आले आहे.
close