*कु. प्रीती विटकर हिचा इस्रो भेटीनंतर युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने गौरव*
*इंदापूर* (दि.३०) :
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्टच्या अंकित असणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवंत विद्यार्थीनी कु. प्रीती विटकर हिची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) भेटीसाठी झालेली निवड ही इंदापूर तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. इस्रोला प्रत्यक्ष भेट देऊन आलेल्या कु. प्रीती विटकर हिचा युग प्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंदापूर येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात सोमवारी (दि.२९) आयोजित लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्त प्रसिद्ध शिवव्याख्याते, शिवश्री डॉ.श्रीमंत कोकाटे सर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष (प्रभारी) अमोल खराडे, राहुल शेवाळे,कैलास कदम, निवास शेळके,प्रा. कृष्णा ताटे,कैलास कदम, हमीद आतार, पोपट पवार, ॲड. इनायतअली काझी, संतोष मखरे, देशमुख आदी उपस्थित होते.
कु.प्रीती विटकर हिचे कौतुक करत तिच्या यशामागील मेहनत, जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे डॉ.कोकाटे यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात पुढे येऊन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन देखील डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी केले.
कु. प्रीती विटकर हिच्या इस्रो भेटीमुळे राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
यावेळी
या सन्मानाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), सचिव ॲड. समीर मखरे यांनी सन्मानार्थी कु. प्रीति विटकर, प्राचार्या समता मखरे तसेच मार्गदर्शक शिक्षक प्रा. सोमनाथ माने,प्रा. संतोष चोरमले, प्रा.रविंद्र रोकडे, प्रा.नामदेव गानबोटे, प्रा.अक्षय क्षत्रिय,प्रा.मेघा यादव यांचे कौतुक केले आहे.

