shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा परिषद शाळा काळेवाडी नं. १ येथे निर्भया (शक्ती) पथकाची जनजागृतीपर भेट*

*जिल्हा परिषद शाळा काळेवाडी नं. १ येथे निर्भया (शक्ती) पथकाची जनजागृतीपर भेट*
इंदापूर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, काळेवाडी नं. १ येथे निर्भया (शक्ती) DYSP बारामती पथकाने विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शन पर अचानक भेट दिली  . या भेटी दरम्यान मुलांमुलीं मधील संवाद अतिशय मनोरंजक, संवादात्मक व विद्यार्थ्यांच्या सहभागातून पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिरेक टाळण्याचे फायदे, सायबर सुरक्षेचे महत्त्व, ऑनलाईन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण, तसेच गुड टच – बॅड टच याबाबत अत्यंत सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर, वैयक्तिक माहितीची गोपनीयता आणि कोणत्याही अनुचित प्रसंगी त्वरित पालक किंवा शिक्षकांना माहिती देण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. निर्भया (शक्ती) पथकाने विद्यार्थ्यांच्या शंकांचे समाधान करत त्यांना सुरक्षित, सजग आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरित केले.
या पथकामध्ये निंबाळकर साहेब काळे मॅडम व भोसले मॅडम उपस्थित होत्या . या सर्वाचे शाळेच्या वतीने निर्भया (शक्ती) पथकाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सुरक्षिततेची जाणीव आणि डिजिटल साक्षरता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. आभार उपक्रमशील शिक्षिका कांचन रणपिसे मॅडम यांनी मानले. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वनराज पोटे व अंगणवाडी मदतनीस मीरा नाईकवाडी मॅडम उपस्थित होत्या.
close