shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वटपौर्णिमेनिमित्त महिला शिक्षिकांना वटवृक्षाची रोपे भेट

वटपौर्णिमेनिमित्त महिला शिक्षिकांना वटवृक्षाची रोपे भेट

नगर प्रतिनिधी:
भारतीय संस्कृती ही निसर्गपूजक आणि कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. प्रत्येक जीवसृष्टीबद्दल आदर आणि पर्यावरण संवर्धनाची भावना आपल्या परंपरेत रुजलेली आहे. याच संस्कारांचा वारसा जपत साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या आदर्श शैक्षणिक संकुलात वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. प्रबोधजी जोशी यांनी शाळेतील सर्व महिला शिक्षिकांना वटवृक्षाची रोपे भेट देऊन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. वटवृक्ष हा दीर्घायुषी, भरपूर प्राणवायू देणारा तसेच पर्यावरणाचा समतोल राखणारा वृक्ष असल्याने त्याचे विशेष महत्त्व असून, त्याचे जतन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरण संरक्षण, निसर्गप्रेम आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कार रुजावेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. उपस्थितांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मा. अशोकजी गोंदकर, सूर्यवंशी सर मुख्याध्यापक, खुळे मॅडम मुख्याध्यापिका,परजणे सर मुख्याध्यापक सर्व शिक्षकव शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
close