अहमदनगर । प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी जवळके येथील युवानेते मा.शुभम दादा थोरात यांची व जिल्हा सरचिटणीस पदासाठी सुरेगाव येथील मा.त्रषिकेष पगारे यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.मयुर ठेंगे व अहमदनगर जिल्हा विशाल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.
आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवतींचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले आहे. त्यांच्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

