संगमनेर । प्रतिनिधी : संगमनेर तालुका धांदरफळखुर्द येथे केंद्र सरकारच्या अंतर्गत बालकल्याण विभाग आणि जिल्हा परिषद अंतर्गत बाल पोषण अभियान राबविण्यात आले यावेळी बाल प्रकल्प अधिकारी राऊत, पंचायत समितीच्या सदस्य,निशाताई कोकणे, सुपरवायझर खरे यांची उपस्थिती होती .
सप्टेंबर महिना हा पोषण महिना म्हणून सर्वत्र साजरा केला गेला त्यामुळे देशभर सर्वच अंगणवाड्यांमध्ये अनेक कार्यक्रम आयोजन केले गेले तर यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची ची सुरुवात झाली यावेळी अंगणवाडीत असलेल्या सेविकांनी अनेक प्रकारचे धान्य कडधान्य आणून भाजीपाला योग्य मांडणी करून त्याचे महत्व महिलांना पटवून दिले यावेळेस, सही पोषण देश रोशन, हा कार्यक्रम राबवण्यात आला यामध्ये प्रकल्प अधिकारी, राऊत, यांनी आलेल्या महिलांना व बालकांना पोषणा विषयी माहिती सांगितली.
यात त्यांनी आपल्या बालकाला कसा आपल्याला चांगल्यात चांगला आहार देता येईल व आपली बालक कसे तंदुरुस्त राहील हे सांगितले. व यानंतर पंचायत समितीच्या सदस्य, निशाताई कोकणे,यांनी आपले मनोगत व्यक्त करून महिलांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात गरोदर मातांचे ओटी भरण तसेच अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यात आले.

