राजगुरुनगर । प्रतिनिधी: विद्याधर साळवे , दि10
कोरोना महामारी च्या काळात गेल्या मागील पाच महिन्यांत सर्वात मोठे संकट नाभिक समाजावर आलेले आहे. लॉकडाऊन काळात सलून व्यवसाय बंद असल्यामुळे आज पर्यंत नाभिक समाजातील 12 युवकांनी आत्महत्या केलेल्या असून नाभिक व्यवसाय 25 टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. समाजाची उपासमारी सुरू आहे. समाजातील विविध मागण्यांसाठी वेळोवेळी शासनाकडे निवेदने देण्यात आलेली आहेत परंतु अद्याप कोणत्याही मागणीचा निर्णय झालेला नाही.
लॉकडाउनच्या काळात आत्महत्या झालेल्या युवकांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत शासनाने करावी , लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सलून व्यवसायिकांना दरमहा दहा हजार रुपये मदत मिळावी , प्रत्येक सलून व्यवसायिकांना पन्नास लाख रुपये विमा संरक्षण देण्यात यावे , सलून व्यवसायकांचे लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे व सलून व्यवसायिकांना संपूर्ण काम करण्यास परवानगी मिळावी या आणि अशा विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र नाभिक महामंडळ खेड तालुका शाखेच्यावतीने खेड तहसिलदार यांना देण्यात आले तसेच पुढील पंधरा दिवसांच्या काळात या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर नाभिक समाज राज्यभर तीव्र आंदोलन करेल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष उदय ऊर्फ बाळासाहेब खंडागळे , खेड तालुका अध्यक्ष मच्छिंद्र भिडवे , जिल्हा सल्लागार विनायक क्षीरसागर , सदस्य माऊली राऊत , शंकरराव गायकवाड आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------------------------------------------------------------------

