shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांव तालुक्यातील दाताडा(बु) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या कारणावरून वृध्दाची हत्या..!!

(सहा आरोपीवर सेनगांव पोलीसात गुन्हा दाखल,अद्याप आरोपी अटक नाहीत) 

हिंगोली  प्रतिनीधी: विश्वनाथ देशमुख
दि.१०,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील दाताडा(बु) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या खुनाच्या कारणावरून एका ७० वर्षीय वयोवृध्दाची हत्या झाल्याची घटना घडल्याने आज दि.१० सप्टेंबर गुरुवार रोजी सहा आरोपीवर सेनगांव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सेनगांव तालुक्यातील दाताडा(बु) येथे दि.०९ सप्टेंबर बुधवार रोजी वयोवृद्ध शेतकरी नामदेव खंडुजी कवडे (७०) हे बटईने केलेल्या शेतात असतांना दि.०९ सप्टेंबर बुधवार रोजी सायंकाळी ०४ वाजेच्या दरम्यान आरोपी अमोल कैलास शिंदे, मच्छींद्र झनकराव शिंदे,प्रदिप झनकराव शिंदे,महादेव शिंदे,भुजंग शिंदे सर्व राहाणार दाताडा(बु) आणि नारायण थिट्टे रा.हत्ता हे तिथे जाऊन दोन वर्षांपूर्वी कैलास शिंदे यांचा झालेल्या खुनाच्या कारणावरून नामदेव कवडे यांच्याशी वाद घालुन त्यांच्या पोटात व गळ्यावर चाकुने वार करुन गंभीर जखमी करुन हत्या करण्यात आली.तसेच फिर्यादी नितीन विश्वनाथ कवडे यांना काठी व लाथाने मारहाण करुन जखमी केले व सदर जखमी हे दवाखान्यात येत असतांना आरोपी नारायण थिट्टे यांनी शिवीगाळ केली.घटनास्थळी डि.वाय.एस.पी.वैंजणे साहेब,डि.वाय.एस.पी.अश्विनी जगताप,सेनगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर,पोलीस उपनिरीक्षक अभयकूमार माखणे यांनी भेट दिली.फिर्यादी नितीन विश्वनाथ कवडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी अमोल कैलास शिंदे,मच्छींद्र झनकराव शिंदे,प्रदिप झनकराव शिंदे,महादेव शिंदे,भुजंग शिंदे,नारायण थिट्टे यांच्यावर सेनगांव पोलीस स्टेशनला गु.र.नं.२९७/२०२० कलम
३०२,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४
भादवि नुसार आज दि.१० सप्टेंबर गुरुवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक सरदारसिंग ठाकुर हे करीत आहेत.
close