शिर्डी एक्सप्रेस सेवा
मा.शौकतभाई शेख
जनतेच्या नागरी समस्या काय आहे त्याकडे पद्धतशिरपणे दुर्लक्ष व्हावे या हेतून गरज नसलेले मुद्दे उकरुन काढत काही राजकारणी मंडळी हेतुपुरस्सर त्याचे भांडवल करत नागरी समस्यांना तिलांजली देत आहेत,पहिलेच कोरोनाने (कोवीड ९०) थैमान घातले असताना जनतेच्या जिवना-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे,त्यावर लॉकडाऊनमुळेतर सर्वच व्यावसाय ठप्प झालेली आहेत,कुटूंबातील सदस्य आजारी पडल्यास दवाखाना आणि औषोधोपचारासाठी खिशात दमडी नसताना शिवाय पोटाची खळगी भरणार कशी असा गंभीर प्रश्न पुढे ठाकला असताना काही राजकारणी मंडळी गरज नसलेल्या मुद्यांच्या प्रकरणात मशगूल आहेत, मागे सहा महिन्यांपूर्वीच एक प्रकरण तीन चार महिने चाललं,आणि सध्या दोन महिन्यापूर्विच्या प्रकरणाचं आजही गुर्हाळ सुरुच आहे,हे प्रकरण सर्वच समाज माध्यमांवर गाजत आहे, कधी गोर-गरीब उपेक्षितांचे ज्वलंत प्रश्र माध्यमांवर गाजणार का ?,त्यांना योग्य न्याय मिळणार का ?, की सध्याच्या माध्यमांवर गाजत असलेल्या प्रकरणांनी त्यांची ज्वलंत प्रश्न मार्गी लागणार का ?,असे एकनाअनेक प्रश्न सध्यातरी अनूत्तरीतच आहेत, ज्येष्ठ कामगार नेते आणि "दैनिक सोलापूर भूषण"संपादक मा. विष्णू करमपूरी (महाराज) हे जनतेच्या नागरी समस्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत नागरी समस्यांप्रती आंदोलने करीत आहेत, याचा बोध घेत राज्यातील सर्वच जानकार कामगार नेत्यांनी त्यांचा आदर्श घेत आता नागरी समस्यांच्याप्रती राज्यभर आंदोलने छेडण्याची वेळ आलेली आहे, तरच केंद्र आणि राज्य सरकार नागरीकांच्या ज्वलंत समस्यांविषयी आपले लक्ष केंद्रित करेल, अन्यथा यापूढे देखील नागरीकांना नको असलेल्या प्रश्नांच्या नादी लावत मुळ प्रश्नांना बगल देण्याच्या कामांत तसे राज्य आणि केंद्र सरकार मोठे पटाईतच आहेत यासाठी नागरी समस्यांकरीता आंदोलने करणे सध्यातरी हीच काळाची गरज ठरत आहे.
शौकतभाई शेख
अध्यक्ष :
स्वाभिमानी संपादक सेवा संघ.

