प्रतिनिधी । मोहन शेगर
मुबंई :- अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस सौ.आशा अरुण गवळी (मम्मी) यांना आज क्राईम सूत्र न्यूज व पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडून कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार शोभा चारीटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष सौ.शोभा चौगुले व क्राईम न्यूजचे संपादक श्री. विकास जगताप यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
आज या कोरोना ( कोव्हिड 19) च्या आणिबाणीच्या काळामध्ये अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस व अनाथांच्या माई सौ.आशा अरुण गवळी ( मम्मी ) यांच्या रूपाने समस्त देशातील जनतेला मानवतेचे दर्शन प्रत्यक्ष घडले, देव नाही दगडात देव आहे माणसात. राष्ट्रसंत श्री.संत गाडगे महाराज, संत शिरोमणी श्री. तुकडोजी महाराज, यांचे विचार आज सत्यात उतरत आहेत. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मी पाहिलेली माणसातली माऊली सौ आशा अरुण गवळी ( मम्मी ).
आज संपूर्ण भारत देश कोरोना सारख्या महारोगाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याकारणाने समाजात ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे. ज्यांचे हातावरती पोट आहे. ज्यांच्याकडे उत्पादनाचे कोणतेही साधन नाही.जे भिक्षा मागून, हातमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात ज्यांचे हातावरती पोट आहे. अश्या प्रकाराच्या लोकांवर आज उपासमारीची वेळ आली होती.
पण अनाथांची माऊली सौ. आशा अरुण गवळी (मम्मी) यांनी समस्त महाराष्ट्रातील जनतेला कोरणा-या महाभयंकर रोगापासून कसे स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला कसे वाचवावे याविषयी लॉकडाउनच्या सुरुवातीपासून ते आज पर्यंत स्वतः जीवाची बाजी लावत मार्गदर्शन करीत आहेत.
एवढेच नाही तर आपल्या माऊलींनी समस्त महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला लॉकडाउनच्या सुरुवातीपासून काळापासून ते आजपर्यंत गोरगरीब जनतेला अन्नधान्य व जीवनाआवशक्य वस्तू देखील पुरवल्या, आणि पूर्वत आहेत ते ही प्रसिद्धीवाद, पक्षवाद, स्वार्थवाद, सोडून अगदी निस्वार्थ मनाने, समस्त भारत देशाला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी अध्यात्माशी नाळ जोडलेली माऊली सौ.आशा माई यांच्या रूपाने अनाथांची आधार निस्वार्थपणे बनणारी माऊली ह्या महाराष्ट्राला लाभली. हे या देशाचे आणि महाराष्ट्राचे सौभाग्य आहे.
कोरोणा ( कोव्हीड 19 ) किंवा पूरग्रस्त परस्थिती असो किंवा या महाराष्ट्रामध्ये कोणतीही आपत्तीजनक परिस्थिती असो सर्वात अगोदर मानसिक आर्थिक आधार जर कोणी या महाराष्ट्राला आणि देशाला दिलेला असेल तर तो अनाथांच्या माई सौ. आशा अरुण गवळी (मम्मी) यांनी दिलेला आहे.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना अखिल भारतीय सेनेच्या सरचिटणीस सौ.आशा अरुण गवळी (मम्मी ) म्हणाल्या की आज आपल्या प्रत्येकाला आपला देश, आपली माणसं आपले कुटुंब यांना सुरक्षित ठेवण्यासाठी लढायचं आहे. आपले कुटुंब, आपले मित्र व समाजामध्ये कोरोनाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. कोरोनावर जरी उपाय नसेल तरी आपण खबरदारी घेऊन आपला, समाजाचा व देशाचा बचाव करू शकतो.
जगावर व आपल्या देशावर आलेल्या या आपत्तीशी लढण्यासाठी आपणा सर्वांना आज स्वयंसेवक , योद्धा होऊन प्रामाणिकपणे जनजागृती करायची आहे . राज्य सरकार व केंद्र सरकार आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करतच आहे, त्याप्रमाणे आपणही आपली जबाबदारी निभावण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सामाजिक बांधिलकी जोपासून मनभेद विसरून एकमेकांना आधार द्यावा. व कोरोना कोव्हिड (19 ) या महाभयंकर रोगापासून स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवावे.
या पुरस्कारामुळे समस्त महाराष्ट्रातील व देशातील जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच याप्रसंगी अखिल भारतीय सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते

