shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरुणीचे अपहरण करून नग्न अवस्थेतील फोटो काढून ब्लॅकमेल, बळजबरीने लैंगिक अत्याचार केला, सहा जणांविरुद्ध गंभीर गुन्हा..!!


प्रतिनिधी । मोहन शेगर :
सोनई :- सोनईपेठ येथील हलवाई गल्लीतील रहिवासी असलेल्या १८ वर्षीय सज्ञान तरुणीचे अपहरण करून नग्न अवस्थेतील फोटो काढून ब्लॅकमेल करून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून त्याच गल्लीतील ६ जणांविरुद्ध अपहरण ब्लॅकमेल लैंगिक अत्याचार पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी इत्यादीबाबत विविध कलमान्वये सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

 याबाबत सोनई पोलीस ठाण्यातून समजलेली माहिती अशी की सोनई येथील हलवाई गल्लीत राहणाऱ्या १८ वर्षे २० दिवस वय असणाऱ्या शिक्षण घेणाऱ्या सज्ञान तरुणीने लेखी फिर्याद दिली कि सन २०१७,सन २०१८ ते ५ सप्टेंबर २०२० पर्यंत या पीडित तरुणीला बळजबरीने पळवून नेऊन अपहरण करून ब्राह्मणी तालुका राहुरी येथील हॉटेल सोनई परिसरातील विविध ठिकाणी पंचवटी नाशिक व नाशिक जिल्ह्यात नेऊन पीडित तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून वेळोवेळी ब्लॅकमेल करून पीडितेवर तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून ऋषिकेश विजय खंडागळे, केशव मनोहर सुद्रिक, संकेत संजय थोरात उर्फ बॉबी, विजय मेघराज खंडागळे, संजय मेघराज खंडागळे व शुभम (पूर्ण नाव माहित नाही) या सर्वांविरुद्ध भादवि कलम ३७६(२)(१)(J) ३५४ A.J. ३६३,३६६(९अ)५०६ तसेच बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६,८,१२, १७ व तंत्रज्ञान अधिनियम ६६इ व शस्त्र अधिनियम ३/२५ प्रमाणे ४१०/२०२० क्रमांकाचा गुन्हा सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी पीडितेच्या फिर्यादीवरून दाखल केलेला असून सहाय्यक निरीक्षक जनार्दन सोनवणे याबाबतचा पुढील तपास करीत आहे.

फोटो पेपर मध्ये टाकून करण्याची बदनामी करू-
पीडित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी ऋषिकेश खंडागळे याने त्याचे वडील विजय मेघराज खंडागळे यांना म्हटले की हिचे नग्न फोटो माझ्याकडे आहेत तिचे वडिलांकडून आपले कापड दुकानाकरीता ५ लाख रुपये मिळू शकतात पैसे न दिल्यास ते फोटो पेपर मध्ये टाकून घराण्याची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती त्यामुळे मी घाबरलेल्या अवस्थेत आरोपी समवेत नाशिकला गेल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे नाशिकहुन सोनाईला आल्यानंतर विजय मेघराज खंडागळे व संजय मेघराज खंडागळे यांनी फोटो पेपर मध्ये देण्याचे धमकावलेने म्हणून मी स्वतःहून ऋषिकेश बरोबर गेले होते असा जबाब १८/८/२०२० रोजी सोनई पोलीस ठाण्यात दिलेला होता असेही पिडितेने फिर्यादीत लेखी म्हटलेले आहे 


सर्व स्तरातून निषेध-
पीडित तरुणीचा वाढदिवस सोनई येथील एका हॉटेलमध्ये साजरा करून तिला नाशिकला पळविण्यात आल्याची घटना १८/८/२०२० रोजी नाशिक येथे नेण्यात आल्याची माहिती सोनईगावात समजलेने सोनईतील ४-५ जीपमधून गल्लीतील तरुण नाशिक कडे गेले होते परंतु पीडितेला पळून घेऊन जाणाऱ्या तरुणाचे वडील संगमनेर मधील एका परमीटरूम समोर सोनईच्या तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडले होते व त्याचे लाईव्ह फेसबुक वर सुद्धा आले परंतु मुलीला पळवून नेणार्‍या तरुणाचे वडिलांसमवेत सोनईतील काही प्रतिष्ठित या फेसबुक मध्ये लाईव्ह आलेने नंतर ते डिलीट करण्यात आल्याची माहिती समजली आहे. दरम्यान गेल्या पंधरा दिवसांपासून सोनई परिसरात पिडीतेच्या कुटुंबाकडुन ५ लाख रुपयाची मागणी करणाऱ्या आरोपीवर तीव्र स्वरूपाचा निषेध व्यक्त केला जात आहे.
close