इंदापूर । प्रतिनिधी( तात्याराम पवार)
कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेच्या इंदापुर तालुका युवती संघटक पदी आज संघटनेचे संस्थापक , अध्यक्ष जयदीप ननावरे यांच्या आदेशाने तसेच कार्याध्यक्ष प्रविण आजबे, संघटक श्रीकांत राजपूत, पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कंक,  पश्चिम महाराष्ट्र युवती प्रदेशाध्यक्षा पुजा पाटणकर आणि पुणे जिल्हा युवती अध्यक्षा प्रांजली जाधव यांच्या मार्गदर्शनाने वृषाली मच्छिद्र पवार (मौजे.रा.गुलाबनगर (रेडा) ता.इंंदापूर ,जि.पुणे ) यांची निवड करत आहोत.


इंदापुर तालुक्यातील संघटनेच्या माध्यमातून कृषी पदवीधर, विद्यार्थीनी, युवती आणि शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. संपूर्ण संघटना आपल्या पाठीशी आहे. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा इंदापूर तालुक्यातील अनेक राजकीय सामाजिक संघटनेतील मान्यवरांनी दिलेल्या आहेत आणि वृषाली पवार निवड झाली अशी माहिती शिवानी  सपकळ युवती अध्यक्षा इंदापुर तालुका कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना, महाराष्ट्र राज्य यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.