shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सेनगांवात केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कृषी विधेयकाच्या निषेधार्थ धरणे आंदोलन..!!

हिंगोली। प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०३,केंद्रातील भाजप सरकारने संसदेत शेतकरी व कामगार विरोधी कायदा मंजुर केलेच्या निषेधार्थ दि.०३ आँक्टोबर शनिवार रोजी सकाळी सेनगांव तालुका काँग्रेसच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत हा कायदा तात्काळ मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन तहसिलदार जिवकुमार कांबळे यांच्या मार्फत देशाचे राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोंविद यांना देण्यात आले.


केंद्रातील भाजप सरकारने संसदेत शेतकरी व कामगार विरोधी कायदा मंजुर करुन शेतकरी व कामगारावर घोर अन्याय करणारा कायदा अंमलात आनण्यासाठी अघोरी प्रयत्न करण्यास भाजप सरकारने संसदेत लोकशाहीचा खुन केला आहे.या कायद्यामुळे देशातील शेतकरी,कामगार उध्वस्त होऊन देश मोठ्या संकटात येईल म्हणून केंद्र सरकारने शेतकरी व कामगार  विरोधी कायदा तात्काळ मागे घेऊन शेतकर्‍यांना व कामगारांना न्याय द्यावा.जर हा जुलमी हुकुमशाहीचा व शेतकरी,कामगार यांच्यावर होणारा अन्यायकारी कायदा तात्काळ रद्द न झाल्यास देशातील सर्व शेतकरी व कामगार एकजुटीने रस्त्यावर उतरुन हुकुमशाही विरोधात लोकशाही पध्दतीने शेतकर्‍यांना व कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही.यावेळी हिंगोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे,हिंगोली जिल्हा काँग्रेस  पक्षनिरीक्षक जितेंद्र देहाडे,सेनगांव काँग्रेस तालुकाध्यक्ष विनायकराव देशमुख,माजी जि.प.सदस्य ओमप्रकाश देशमुख,उप जिल्हाध्यक्ष अशोकराव सरनाईक(मेजर),बंडुनाना देशमुख,शहराध्यक्ष दिलीप होडबे,बाळु कदम,प्रकाशराव वाघ,मधुकर जाधव जामठीकर,दिलीपराव देशमुख,डाँ.माणिकराव देशमुख,यासिन पठाण,प्रभुआप्पा जिरवणकर,राजाराम मोटे,गजानन विटकरे,राजाराम तांबीले,अशोक सानप, विठ्ठलराव शिंदे आदीसह काँँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्त्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close