हिंगोली। प्रतिनिधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०३,हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीचा कारभार व गावचा कायापालट ग्रामसेवक श्री. उत्तम आडे यांनी केला आहे. त्यांच्या अथक परिश्रमांनी येथील स्मशानभूमीला स्वर्ग प्राप्त झाला असून आता या स्वर्गात भाजीपाल्या चा मळा फुलविला जात आहे.



स्मशान म्हटले की भूत-प्रेत, आत्मा आदी दृश्य सर्वसामान्यांच्या दृष्टीपथात येते पोर्णिमा अमावशेला तर या ठिकाणाकडे पाहिले ही जात नाही.अनेकदा येथे जळणारे प्रेतही काहींना पाहिले जात नाही. या सर्वांची भीती ग्रामस्थांच्या मनात कायम असते. परंतु हिंगोली तालुक्यातील वाटेगांव येथे असामान्य दृश्य कोणालाही दिसेल व व कोणीही या स्मशानभूमीत ऊन बसल्याशिवाय पुढे जाणार नाही अशी स्थिती व विकास ग्रामसेवक श्री. उत्तम आडे यांनी करून दाखविला आहे. ग्रामसेवक उत्तम आडे यांनी दाटेगाव चा कायापालट केला आहे. गावात स्वच्छतेसह ग्रामस्थांना सर्व मूलभूत गरज व आवश्यकता सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. तसेच ग्रामस्थ मिळणाऱ्या सोयी - सुविधा मूलभूत सोयीसुविधांचा वेळेवर कर भरणा करतात. त्यामुळे या सर्व गोष्टी साध्य झालेले आहेत ग्रामसेवक उत्तम आडे यांनी ग्रामस्थांच्या मिळणाऱ्या प्रतिसादास उत्तम प्रकारे अमलात आणत गावचा कायापालट केला आहे. येथील स्मशानभूमी त वृक्ष लागवड व सुशोभीकरण केले आहे. तसेच बसण्यासाठी बाकडे ही ठेवण्यात आले असून कोणाही वाटसरू येथून जाताना क्षणभर येथे बसण्याचा मोह आवरत नाही. या ठिकाणी आता भाजीपाला लावला जात असून ग्रामस्थ याठिकाणी नाश्ता, जेवण, चहा असे सर्वकाही बसून घेतात. तसेच भोजनाचा हे आस्वाद घेतात. येथील जेवणाचा वन जेवण म्हणून आनंद घेतला जातो. याठिकाणी आता ग्रामसेवक उत्तम आडे यांनी वांगी, मिरची, कोबी, भेंडी आदी भाजीपाला लागवड सुरू केली आहे. त्यामुळे आधीच स्वर्गात व प्राप्त झालेल्या या स्मशानभूमीत आता भाजीपाल्याचा मळा ही फुल दिला जात आहे. यातून गावातील ग्रामस्थांनाही सकस आहार मिळण्यास उपयोग होणार असून काही भाजीपाला विक्रीसाठी ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 


स्मशानभूमीच्या झाले नंदनवन
दाटेगाव येथील स्मशानभूमीत ग्रामसेवक उत्तम माडे येण्यापूर्वी एक मोठा खड्डा होता. या स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली होती. इतर गावच्या स्मशानभूमी प्रमाणे येथील स्मशानभूमी ही होती. परंतु श्री. उत्तम आडे यांनी गावचा पदभार घेताच गावचा कायापालट बरोबर येथील स्मशानभूमीचे ही नंदनवन करून सोडले आहे. आता या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करून भाजीपाल्याचा मळा फुलविला जात आहे. या भाजीपाल्याचा गावातील ग्रामस्थांना सकस आहार मिळविण्यास फायदाच होणार आहे.