प्रतिनिधी । औरंगाबाद: दत्ता जाधव 3 आक्टोबर
औरंगाबाद कोविड मुक्त करण्यासाठी ' माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत लोक चळवळीचा भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्रतिज्ञा घेऊन आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
या अनुषंगाने सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय तसेच नागरिकांनी आपल्या घर ऑफिस जिथे असतील तिथे 6 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता नियोजित वेळेत प्रतिज्ञा घेण्यासाठी सहभागी व्हावे तसेच शारीरिक आंतर पाळणे, सानिटीझर, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे अशी प्रतिज्ञा माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत घ्यावी या कार्यक्रमाचे अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय येथे कार्यक्रमाचे फोटो दिनांक सात ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या मेलवर पाठवावे
abdcoll@gmail. com

