shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संगमनेर : ४ एक्कर झेंडू वर शेतकर्याने फिरवला रोटर....!!

संगमनेर। प्रतिनिधी :-
अक्षरशा ४ एकर झेंडू वर शेतकऱ्याला रोटर फिरवावा लागला आहे. आता शेतकरी बाजारभाव मुळे अक्षरशा त्रासून गेला आहे. यामध्ये त्याला काही फायदा काही होईना. यात शेतकऱ्याला आधी चक्रीवादळाने, त्यानंतर पाऊस शेतकऱ्याला त्रासून सोडले  व आता माल मातीमोल भावाने द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. 

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील खंदरमाळ वाडी, येथील शेतकरी ,अशोक धोंडीभाऊ पाडेकर, यांनी आपल्या ४ एकर झेंडू वर रोटर फिरवला आहे. अशोक धोंडीभाऊ पाडेकर यांनी सांगितले की गणपती मध्ये फुलांना भाव होता व त्यानंतर मी झेंडूची फुले लावली व त्यानंतर जेव्हा फुले काढायला आली तेव्हा बाजार भाव कोसळून ५-१० रुपये किलो होता व त्यानंतर त्यांनी फुले तोडून बांधावर टाकली की भाऊ वाढेल पण काय भाव  काय वाडेना व फुले तोडायला ही परवडणार नाही या झेंडूच्या प्लॉटला दोन लाख रुपये खर्च झाला आहे. पाडेकर यांनी कलकत्ता झेंडूचे रोप घेऊन ४ एकर शेतामध्ये लागवड केली. 

त्यानंतर फवारणी, खत , औषध, मोठा खर्च झाला. पाडेकर यांनी पुन्हा बाजार भाव वाढतील म्हणून झेंडू न तोडण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर भाववाढेना म्हणून त्यांच्या झेंडूला त्यानंतर अखेर रोटर मारला. आधीच शेतीला भाव नाही. त्यातही कधी चक्रीवादळ तर कधी पाऊस यामध्ये शेतकऱ्याच्या तोंडाचा घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. या कडे शासन, प्रशासन लक्ष देणार का? याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.
close