शिर्डी एक्सप्रेस:
नाशिक विभाग प्रतिनिधि:
ता: 2-10-2020
येवला:- उत्तरप्रदेश येथील हाथरस या ठिकाणी झालेल्या सामूहिक बलात्काराच्या निषेधार्थ येवला येथे बहुजनांनी फलक दाखवून निषेध व्यक्त केला.
हाथरस येथे मनीषा वाल्मीकि ( वय 19 ) या मुलीवर चार नराधमांनी अत्याचार करुन तिची जीभ कापली व तिला जबर मारहाण करुण तिचे पाठिचे मनकेहि तोडन्यात आले.14 सप्टेंबर रोजी ही घटना घडली.या नंतर ती मुलगी दिल्ली येथील हॉस्पिटल मध्ये नऊ ते दहा दिवस मृत्युशी झुंज देत अखेर तिची प्राणज्योत मावळली. तरीही या उत्तरप्रदेश सरकारने तिची कोणतीही दखल घेतली नाही.अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे येवला शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे येवला शहर उपाध्यक्ष गोटू मांजरे यांनी दिली.
या दलित विरोधी सरकारचा निषेध म्हणून आज दि:2 ऑक्टोबर रोजी दलित अत्याचार प्रतिरोध दिवस म्हणून साजरा करण्यात आला .
या फलक निषेधामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय विभाग येवला शहराध्यक्ष सुभाष गांगुर्डे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी येवला शहर उपाध्यक्ष गोटू मांजरे,प्रल्हाद जगताप,संतोष राउळ,दिपक गुंजाळ,सुभाष जगताप,सिद्धार्थ त्रिभुवन,सिद्धार्थ हिरे,गौतम लाठे,दत्तात्रय कोटमे, मिलिंद पगारे, आकाश भालेराव, युवराज पगारे, मिलिंद गांगुर्डे,शुभम गायकवाड, संदीप जोंधळे,अक्षय शिंदे,नईमभाई शेख,कदिरभाई शेख,सुरेश मांजरे,सीताबाई गांगुर्डे,ज्योती गांगुर्डे,शशिकला त्रिभुवन, हीराबाई जाधव,अलका सपकाळ,बबलू मांजरे, राहुल मांजरे,आदी सहभागी झाले होते.

