इंदापूर । प्रतिनिधी तात्याराम पवार
बाभुळगाव दि. ७ ऑक्टोबर २०२०(ता. इंदापूर जि. पुणे) बाभुळगाव येथील युवक अजय टिपाले यांनी काल शिवगर्जना फॅब्रिकेशन चे उद्योग सुरू केला असून त्याचे उद्घाटन बावडा लाखेवाडी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री श्रीमंत ढोले सर व भाजपचे युवा नेते अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की युवकांनी आपल्या कला कौशल्यातून रोजगार निर्मिती म्हणून स्वतःचा व्यवसाय चालू करावा व त्यातून आपली आर्थिक प्रगती सुधरावे यातूनच आपल्या जीवनाचा विकास होत असतो आज कोरोना सारख्या विषाणूजन्य परिस्थितीत अनेक युवकांचे नोकरी विना परवड झालेली दिसत आहे.
अशा परिस्थितीत स्वतःच्या अनुभवाचे व कलाकौशल्य या जोरावर या युवकाने शिवगर्जना या नावाने फॅब्रिकेशन व्यवसायाचा उद्योग चालू करून गावामध्ये आपला उद्योगाचा वेगळा ठसा निर्माण केल्या असल्याने गावात त्याच्या या आदर्शाचे व धाडसाचे विशेष कौतुक होत आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती असलेले ढोले सर यांनी युवकांना सध्याच्या परिस्थितीमध्ये व्यवसायाभिमुख राहून कशी प्रगती करावी याबद्दल मार्गदर्शन करून या फॅब्रिकेशन उद्योगास शुभेच्छा दिल्या.या उद्घाटनास दत्तात्रेय टिपाले संभाजी टिपाले गोविंद जगताप संजय देवकर अशोक टिपाले शासनाच्या नियमाचे पालन करून उपस्थित होते

