बीड । जिल्हा प्रतिनिधी: प्रकाश मुंडे :-
केंद्र सरकारने शेती सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केले आहे त्यानुसार अनेक राज्यात हे विधेयक लागू झाले आहे परंतु महाराष्ट्रात हे नवीन विधेयक लागू करण्यास राज्य शासन तयार नसल्याने सदरील विधेयक लागू करण्यात यावे तहसील कार्यालयासमोर भाजप नेते रमेश आडसकर यांच्या उपस्थितीत निदर्शने करण्यात आली.
केंद्र सरकारने नवीन शेती सुधारणा विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केले आहे त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी अनेक राज्यात सुरु झाली आहे या विधेयकामुळे शेतकरी वर्गाला शेतमाल विक्री सारही स्वातंत्र मिळाले आहे शेती मालाला रास्त भाव व आर्थिक उत्पन्नांत वाढ होणार आहे त्यामुळे हे विधेयक शेतकरी हिताचे असून बागायतदार शेतकऱ्यांना आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे नवीन विधेयक कायद्यास स्थगिती दिली आहे या स्थगितीमुळे राज्यातील कृषी माल विक्री स्वातंत्र हिरावले जात असून हा शेतकऱ्यावर अन्याय आहे राज्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्याचा रोष निर्माण होत आहे.
शेतकऱ्याचे हित लक्षात घेऊन नवीन कृषी सुधारणा विधेयक कायदा वरील स्थगिती उठवून त्याची अंमलबजावणी करावी अशी विनंती राज्यातील शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत असल्याचे निवेदन देत भाजप नेते रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने तहसील कार्यालयासमोर असंख्य भाजप केले.

