shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला राज्यात स्थगिती दिल्याने सेनगांवात भाजच्या वतीने आदेशाची होळी..!!



हिंगोली । प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि.०७,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आज दि.०७ आँक्टोबर बुधवार रोजी भाजपा च्या वतीने महाराष्ट्र सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असलेल्या आदेशाच्या परीपत्रकाची होळी करुन जाहीर निषेध करण्यात आला. 






मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी व शेतकऱ्यांना आपला माल रास्त भावात विकण्यासाठी पूर्णपणे स्वतंत्रता देण्यासंदर्भात जो कायदा केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला त्या कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात महाराष्ट्र सरकारच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेले विधेयक लागू न करण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री विकास व विनियम अधिनियम १९६३ चे कलम ४३ अनवे अर्ज क्रमांक १३, २०२० मधील स्थगिती आदेश देऊन हे विधेयक महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीने महाराष्ट्रामध्ये हे लागू केले आहे या महाराष्ट्र विरोधी विधेयकाचा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेनगाव येथे होळी करून जाहीर निषेध करण्यात आला याप्रसंगी अशोकरावजी ठेंगल तालुका अध्यक्ष सेनगाव,शंकररावजी बोरुडे भाजपा जिल्हा सचिव,अप्पासाहेब देशमुख भाजपा नेते माजी पंचायत समिती सभापती,विलासराव खाडे नगरसेवक व गट नेते नगरपंचायत, पंडित तिडके भाजपा तालुका अध्यक्ष किसान मोर्चा सेनगाव, गणेशरावजी जारे भाजपा उप तालुकाध्यक्ष, डॉ. साहेबरावजी तिडके,भाजपा शहरअध्यक्ष संतोष भाऊ खाडे,नगरसेवक अजय विटकरे,नगरसेवक कैलास खाडे भाजपा तालुका ऊप अध्यक्ष मारोतरावजी काळबांडे भाजपा नेते श्री राम देशमुख युवा भाजपा नितीन कुटे भाजपा किसान मोर्चा तालुका सचिव विलास तिडके युवा भाजपा सोंडू पाटील युवा भाजपा महादेव धोत्रे अशोकरावजी खंडागळे शेतकरी रुस्तुम रावजी बांगर शेतकरी व भाजपा कार्यकरत्यांनी  शेतकरी विरोधी परी पत्रकांचे होळी करून जाळून टाकले व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले याप्रसंगी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close