तक्रारवाडी दिनांक २/१०/२०२० रोजी केंद्र शासनाच्या वतीने फिट इंडिया मूमेंट या अभियानाचा माध्यमातून दिनांक १५ ऑगस्ट ते २ऑक्टोबर या काळामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून आज तक्रारवाडी उपकेंद्रांमध्ये धावणे सायकल चालवणे व शारीरिक व्यायाम इत्यादी शरीर सुदृढ होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी डॉक्टर मृदुला जगताप म्हणाल्या की लोकांचे आरोग्य उत्तम राहावे हाच फिट इंडिया चळवळीचा उद्देश. फिटनेस हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. 


फिटनेस हा केवळ एक शब्द नसून ती आरोग्यपूर्ण जीवनाची दिशा आहे यावेळी फिट इंडिया मोमेंट मध्ये तक्रारवाडी व परिसरातील  नागरिकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये रोटरी क्लब चे अध्यक्ष संपत बंडगर डॉक्टर निंबाळकर डॉक्टर रंजीत भोंगळे औदुंबर हुलगे डॉक्टर मोरे रियाज शेख संतोष सवाने डॉक्टर अमोल खानावरे डॉक्टर अमित खानावरें केशव भापकर राहुल गुंदेचा अल्ताफ शेख पंकज भैया काशीद यादव सिस्टर इत्यादी लोकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात ५८ जणांनी उपस्थिती दर्शवली अशी माहिती डॉक्टर मृदुला जगताप यांनी दिली