shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोरोना उपचारासाठी अलिबाग मधील पहिले खाजगी रुग्णालय "रानवडे हॉस्पिटल; अलिबाग "

अलिबाग (रायगड)।राजेश बाष्टे :- अलिबाग तालुक्यातील वाढता कोरोना रुग्णांचा आकडा आणि कोणतंही खाजगी रुग्णालय अश्या रुग्णांना दाखल करून घेत नसल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय ,नातलगांची हाताशता लक्ष्यात घेता ,अलिबाग मधील जेष्ठ ,नामांकित, प्रतिथयश डॉक्टर दाम्पत्य डॉ .मोहन रानवडे आणि डॉ .सौ .स्वाती रानवडे ह्यांनी स्वतःला ह्या कामासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रानवडे हॉस्पिटल हे चेंढरे इथे असून अत्यावश्यक सेवा पुरवणारं अग्र क्रमांकावरील रुग्णालय आहे, आणि आता कोरोना रुग्णासाठीच अलिबाग आणि पंचक्रोशीतील पहिला खाजगी रुग्णालय ह्या सेवेसाठी त्यांचा कार्यक्षम कर्मचारी वर्ग आणि अत्याधुनिक सामग्री उपलब्ध करून दिली आहे.

हे दाम्पत्य नामांकित ,प्रतिष्ठित अश्या सरकारी कॉलेज मधून पदवी व्युतर (MD -physician )झालेले  आहेत. शहरातील उच्च पद आणि पैसा ह्यांना धुडकावून अलिबाग मधील लोकांची सेवा करण्याच्या अट्टहासापोटी कारकिर्दीची सुरवात अलिबाग सरकारी इस्पितळातून केली . योगायोगाने सरकारी इस्पितळात ,  १९९६ साली रायगड मधील पहिला  I C U युनिट चालू करण्याच्या प्रक्रियेत सुद्धा ह्या डॉक्टर दाम्पत्याचा  मोलाचा सहभाग होता. 

सर्व वैद्यकीय सेवा उपलब्ध असलेल्या या मॉर्डन नर्सिंग होम(रानवडे हॉस्पिटल) मध्ये कोरोना पॅसिटिव्ह रुग्णांवर उपचार होणार असल्याने अलिबाग करांसाठी ही महत्त्वाची बाब आहे. ह्या हॉस्पिटल ला कोरोना हॉस्पीटल ची परवानगी मिळण्याकरिता अलिबागाचे तहसीलदार श्री.सचिन शेजाळ व शासनाचे मोलाचे सहकार्य झाल्याचे डॉ. मोहन रानवडे यांनी सांगितले.
close