इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
इंदापूर दिनांक १/१०/२०२० रोजी इंदापूर येथे आज मुक्ताई क्लीनिक या हॉस्पिटलचे उद्घाटन झाले यानिमित्त युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते अमोल राजे इंगळे यांनी डॉक्टर देवकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या त्यावेळी ते म्हणाले की, डॉ. अमित देवकर व डॉ. प्राची देवकर यांनी संघर्ष करत आपले डॉक्टरी शिक्षण पूर्ण करून आज इंदापूर मध्ये सुरु केलेल्या मुक्ताई क्लिनीक मुळे लहान मुलांचे आरोग्य सदृढ होण्यास मदत होईल. नव्याने सुरु केलेल्या आरोग्य सेवेतून व आपल्या हातून अशीच लहना मुलांच्या आरोग्याची सेवा घडो अशा अपेक्षा व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

