प्रतिनिधी। औरंगाबाद @ दत्ता जाधव 1आक्टोबर
औरंगाबाद - नवरात्रीत भरणारी कर्णपुरा यात्रा या वर्षी करोना मुळे रद्द करण्यात आली आहे अशी माहिती औरंगाबाद चे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. दरवर्षी लाखो भाविक यात्रेत हजरी लवतात, नागरिक सहकुटुंब यात्रेत येतात देवी चे दर्शन घेऊन जातात, या यात्रेत दुकानें, हॉटेल, रात पाळणे, सर्कस येत असे या वर्षी कोरोना मुळे शासनाने बंदी घातली आहे. शासनाने घालून दिलेल्या आटी नुसार नियम पाळून पूजा करू अशी माहिती कर्णपुरा संस्थान चे अध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी दिली.

