इंदापूर । प्रतिनिधी (तात्याराम पवार)
भादलवाडी दि ७ ऑक्टोबर २०२० जनसामान्याचे नेतृत्व राजवर्धन पाटील यांनी आज बुधवार रोजी , भादलवाडी येथे कनेरकर यांच्या सांत्वन भेटीला गेले असता , श्री तुकाराम जनार्दन परकाळे वय ७५ . यांच्या अचानक हातातील काठी निसटली आणि जमिनीवर पडली .
हे पाहताच क्षणाचाही विलंब न करता या आजोबा कडे राजवर्धन पाटील यांनी धाव घेतली काठी उचलून हातात दिली. यावेळी राजवर्धन पाटील यांनी त्यांच्या हातात हात देऊन आरोग्याची विचारपूस केली. कर्मयोगी शंकरराव पाटील यांच्या काळातील निष्ठावान कार्यकर्ते भेटल्याचा आनंद व्यक्त केला .
अशाप्रकारे जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत अंगीकारलेल्या दादांनी आपल्या या कृतीतून दाखवून दिले यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्यांनी दादांचे विशेष कौतुक केले या घटनेवरून असे लक्षात येते की, "ज्येष्ठांना अशा आधाराची युवकांकडून गरज असते .
तसा आधार ज्येष्ठांना तरुण पिढीने द्यायला हवा."तालुक्यातील लोकांच्या सुखदुःखात गाठीभेटी घेत असताना अशा कठीण परिस्थिती मदतीला धावून जाण्याचे राजवर्धन पाटील यांचे कार्य जनतेला चालना देणारी ठरणार असल्याची जनतेतून चर्चा दिसून येते आहे.

