shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठा क्रांती मोर्चाचा परळीतून पुन्हा एल्गार..!!

आरक्षणाच्या मागणीसाठी गुरूवारपासून बेमुदत धरणे आंदोलन..!! 
 
बीड ।‌ जिल्हा प्रतिनिधी :प्रकाश मुंडे:-
 मराठा आरक्षणासाठी सकळ मराठा समाज आणि मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने पुन्हा एल्गार पुकारण्यात आला आहे. येत्या गुरूवारपासून परळीत तहसिल कार्यालयासमोर बेमुदत साखळी पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी परळीत यासंबंधी निर्णय घेण्यासाठी व्यपक बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत आंदोलन करण्याच्या मार्गावर एकमुखी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. गुरूवार दि.०८ ऑक्टोबरपासून या साखळी धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात येत असून, यासंदर्भात गावोगावी बैठका व जनजागृती करण्यात येत आहे.


मराठा आरक्षण आणि मराठा समाजातील तरूणांच्या नोकरीचा प्रश्न हा अत्यंत जिव्हाळ्याचा बनला आहे. त्याचबरोबर शैक्षणीक आरक्षणालाही मा.सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली असल्याने आरक्षणाचा मोठा पेच निर्माण झाला आहे. 

न्यायालयीन स्तरावर ही लढाई लढली जाणार तर आहेच परंतू लोकशाही मार्गाने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात येणार आहेत. परळीतही बैठक घेवून एकमुखी आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने एका बैठकीतून घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी परळीत २१ दिवसांचे खूप मोठे आणि व्यपक आंदोलन करण्यात आले होते. आरक्षणासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात दिसून आले होते. 

आता पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी एल्गार पुकारण्यात आला असून, दि.०८ ऑक्टोबरपासून परळी तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरूवात होणार असल्याची माहीती कळते आहे.
close