लोहा। प्रतिनिधी :
नांदेड जिल्ह्यात अल्पावधीतच आपल्या कार्याचा ठसा उमटवून जनसामान्यांत लोकप्रिय जिल्ह्यधिकारी म्हणून ओळखले जाणारे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे अभिष्टचिंतन लोहा न.पा.चे कर्तव्यदक्ष . लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी लोहा शहराच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार  घालून केले.

खारिक खोबऱ्याचा हार म्हणजे शक्तीचे प्रतीक आहे  नांदेड जिल्ह्यात कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्याधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची अहोरात्र सेवा केली न  कळतच त्यांना ही कोरोनाची बाधा झाली होती त्यावर त्यांनी यशस्वीरीत्या शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन कोरोनावर मात  केली. तसेच जिल्ह्यात अनेक शासकीय योजना ची अंमलबजावणी करणे ,आदी कार्य उत्कृष्टपणे करणारे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना बळ मिळो. 

अशी सदिच्छा व्यक्त करून नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी त्यांचा लोहयाच्या पंरपंरेनुसार खारिक खोबऱ्याचा हार घालून जिल्ह्याधिकारी लक्षडॉ.विपीन इटनकर यांचे अभिष्टचिंतन केले.यावेळी दिनेश पाटील मोटे, गणेश बगाडे, पत्रकार बाळासाहेब कतुरे आदी उपस्थित होते.