shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहिगाव येथे बीज शाळा प्रात्याक्षिक..!!

नगर। प्रतिनिधी(शिवा म्हस्के):
नगर तालुक्यात या वर्षात चांगला पाऊस झाल्याने शेती मशागतीला वेग आला आहे.पाऊसाने उघड दिल्याने ज्वारी पेरणी साठी शेतकरी सरवाले आहेत. ज्वारी पेरणी पार्श्वभूमीवर दहिगाव येथील राम मंदिर ठिकाणी शेतकरी बांधवांना कृषी विभागा मार्फत बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक केले. त्यात प्रामुख्याने ज्वारी बीजप्रक्रियाचे कृषी विस्तार अधिकारी जालिंदर गांगर्डे,  कृषी सहायक ज्ञानेश्वर महाडीक, यांनी बीज प्रात्याक्षिक करून दाखावले व‌ बीजप्रक्रियाचे महत्व पटवून दिले.

बीज प्रक्रिया म्हणजे बियाणे जमिनीत पेरणीपूर्वी जमिनीतुन किंवा बियाण्यातुन पसरणारे विविध रोग किडीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाणांची उगवण‌ क्षमता वाढवण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची केली जाणारी प्रक्रिया बिज प्रक्रिया काय आहे.व ती कशासाठी असते व कशी असते या बर्याच प्रश्नाचे उत्तर शेतकरी बांधवांना मिळाले.व यात काही शेतकरीकर्याना बीज प्रक्रिया माहिती असते पण तंत्र शुध्द नसल्याने त्यांचा पुरेपुर फायदा होत नाही. हि बीज प्रक्रिया समक्ष पाहून न व समजावून घेतल्याने शेती मधील पिकांना रोग आळी प्रादुर्भाव होत नाही, हे हि लक्षात आले.

बीजप्रक्रिया मधील शेतकरयां मधील बरेच गैरसमज दूर झाले. बियाणे हा शेती मधला प्रमुख  पहिला घटक असतो कीड रोगांपासून मुक्त असलेल्या बियाण्यास बाजारात मागणी असते. "शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी" या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे जर बियाणे उत्तम प्रतिचे असेल तर त्या पासून मिळणारे उत्पादन चांगल्या गुणवत्तेचे असते.व शेतकरी बांधवांना उत्पन्न चांगले दर्जेदार मिळते या बीज प्रात्याक्षीक प्रसंगी ग्रा.सदस्य बाळासाहेब हंबडेॅ, आसाराम वाघ, माणिक म्हस्के,ज्ञानदेव म्हस्के,नथुराम जावळे,दादा हंबडेॅ, संजय पोटरे, आदी शेतकरी या वेळी उपस्थित होते.
close