-पंचायत समिती सदस्य संदीप गुंड यांच्या हस्ते लोकार्पण
नगर। प्रतिनिधी (शिवा म्हस्के ):
नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे पंचायत समिती सदस्य संदीपजी गुंड यांच्या प्रयत्नाने दशमी गव्हाण गावा मध्ये गावांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी चार बाकडे भेट देण्यात आले. पंचायत समितीच्या निधीतून दशमीगव्हाण गावासाठी चार बाक व विठ्ठल रुख्मिनी मंदिरासाठी प्रारंगणात पेव्हर ब्लॉक देण्यात आले.
यावेळी बोलताना पंचायत समिती सदस्य संदीप गुंड म्हणाले की दशमीगव्हाण ग्रामस्थांच्यावतीने तसेच तरुण वर्गाच्या वतीने गाव विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून दशमिगव्हाण च्या युवकांचा आदर्श इतर गावांतील तरुणांनी घेउन गावविकासात हातभार लावणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
पेविंग ब्लॉक व बाकडे दिल्याबद्दल शिवसेना शाखाप्रमुख संतोष काळे यांनी नगर तालुका शिवसेना तसेच पंचायत समिती सदस्य संदीप गुंड यांचे आभार मानले.
यावेळी शिवसेना दशमीगव्हाण शाखाप्रमुख संतोष काळे, पोलीस पाटील जयसिंग काळे ,काशिनाथ काळे, बंडू काळे, किशोर काळे, शिवाजी काळे, आदी उपस्थित होते.

