ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार प्रमुख   आणि पदाधिकारी यांचा दिवाळी साजरी न करण्याचा  निर्णय :शहीद झालेले कुटुंबाच्या दुःखात होणार सहभागी 

इंदापूर :-
ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार प्रमुख  एस.एच.पारखे  यांनी स्वता  व पदाधिकारी यांनी दिवाळी साजरी न करण्याचा  निर्णय  घेतला असून व कोरोना महामारी या काळात शहीद झालेले अधिकारी,  पोलिस, डॉक्टर ,नर्स  ,सफाई कामगार,पत्रकार ,ॲम्बुलन्स चालक, शेतकरी यांच्या कुटुंबाच्या दुःखात होणार सहभागी होणार आहे.
     
अनेक मान्यवरांनी मला फोन करुन व एसएमएस'द्वारे शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला पण मी आपणा सर्वांना माझे दुःख सांगू शकलो नाही. खरंतर आज रोजी आपल्या सर्वांचा दीपावली सण आहे या सणानिमित्त अनेक क्षेत्रांतील सामाजिक,  शैक्षणिक,  सांस्कृतिक,  कलावंत,  शासकीय,  निमशासकीय , पत्रकार राजकीय , शेतकरी , महिला मंडळ तसेच मित्रपरिवार अशा अनेक व्यक्तींच्या मला शुभेच्छा येत आहेत.
 
आपल्या शुभेच्छा देणे म्हणजे माझ्यासाठी माझ्या शरीरात उर्जा शक्ती निर्माण होणे हा खरा एक आशीर्वाद आहे.
 
आपल्या सर्वांचे असेच कायमस्वरूपी आशीर्वाद माझ्यावर असू द्या पण खरं तर मी आज दीपावली सण साजरा न करण्याचा निर्णय ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार या संघाच्या प्रमुख नेतृत्व एस.एच.पारखे या नात्याने आपणा सर्वांना सांगू इच्छितो कि,  मी या दिपावलीच्या सणाला खूप दुःखी आहे कारण संपूर्ण भारतामध्ये कोरोना महामारी काळांमध्ये पोलीस,  डॉक्टर,  नर्स , सफाई कामगार , पत्रकार,  संपादक,  ॲम्बुलन्स चालक तसेच शेतकरी सामाजिक , शैक्षणिक ,आर्थिक,  कलावंत अशा अनेक मान्यवरांचा या कोरोना महामारी काळांमध्ये जे काही शहीद झाले आहेत.अशा सर्वांच्या कुटुंबियांवर त्या परिवारामध्ये किंवा घरांमध्ये दुःखाची दिवाळी आहे. ज्यांनी अहोरात्र आपल्या स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या संरक्षणासाठी उभे राहिले असे माझे खरे रक्षक महाराष्ट्राचे म्हणून आज रोजी जे पोलिस प्रशासनातील अधिकारी देखील शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबीयांना मी आज दुःखात पाहत आहे.  ज्यांनी आपल्यासाठी अहोरात्र काम केले अशात काही अधिकाऱ्यांना स्वतःचे घर देखील बघायला मिळाली नाही .


ड्युटीवर असताना स्वतःच्या मुलाबाळांकडे बघायला वेळ मिळत नव्हता अशाच वेळी आमचे मित्र तसेच मला कायमस्वरूपी भावासारखे साथ देणारे अमळनेर पोलिस दलातील उपविभागीय पोलिस अधिकारी कै. राजेंद्र ससाणे  यांचा अपघात झाला व त्या ठिकाणी ते शहिद झाले.  तसेच पुणे जिल्ह्यातील गोरगरिबांच्या अहोरात्र आवाजाला धावून जाणारे आमचे बंधुतुल्य पुणे क्राईम ब्रँच डीवायएसपी कै. विनायक खंदारे  हे ही कोरोना महामारीच्या काळात शहीद झाले .तसेच अनेक पोलीस खात्यातील व पत्रकार,  डॉक्टर,  नर्स  तसेच सामाजिक,  शैक्षणिक,  शेतकरी व आपण ज्यांच्या जीवावर सुरक्षित जगतो असे आपल्या देशासाठी शहीद झालेले जवान शहीद झाले.

 
त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला देखील आपणास कोरोना महामारी या आजारामुळे गर्दी करता आली नाही. त्यामुळे आज रोजी महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये हि दिवाळी दुःखात आहे त्यामुळे मी ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार पदाधिकारी यांना नम्र विनंती करतो की,  कोणीही फटाकडे किंवा धूम धडाका करण्यापेक्षा आपण आपल्या घरात शांततेने राहून दिपावली साजरी करावी.  तसेच आपण आपल्या घरामध्ये दिपावली साजरी करत असताना दहा मिनिटं तरी जे आज आपल्यासाठी व आपल्या रक्षणासाठी तसे देशासाठी शहीद झाले यांच्यासाठी दहा मिनिटे वेळ काढून तरी यांच्या नावाने एक ज्योत (दिवा ) प्रत्येकाने आपल्या घरात लावा असे आव्हान मी ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार पदाधिकारी यांना प्रमुख नेतृत्व या नात्याने करत आहे.
 तसेच अनेक सामाजिक, शैक्षणिक , कलावंत अशा अनेक व्यक्तींनी व सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेने आपल्यासाठी ज्यांनी प्राणाची आहुती दिली आहे . त्यांनी एक तरी दिवा शहीदांच्या नावाने लावा असे मी आपणा सर्वांना ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार,  कोअर कमिटीच्या वतीने व महाराष्ट्रातील सर्व दाधिकार्‍यांच्या वतीने करीत आहे. त्यामुळे दिवाळी साजरी तुमच्या घरामध्ये असेल आणि ज्या घरांमध्ये दुःख पोहोचले त्या घरासाठी तरी एक दिवा लावून त्यांच्या घराला सुख मागावे अशी आपणा सर्वांना नम्र विनंती करत आव्हान केले .व आपणा सर्वांना एक दिवा लावणे म्हणजे दिपावली तसेच बलिप्रतिपदा व भाऊबीजेच्या शुभेच्छा  ही खरी भेट आहे...