shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाच शेतकऱ्यांच्या हस्ते श्री नंदिकेश्वर मशनरीचे उद्घाटन संपन्न..!!


इंदापूर: दि.१७ नोव्हेंबर २०२०.
लाळगे परिवार यांच्या श्री नंदिकेश्वर मशनरी या व्यवसायाचे उद्घाटन पाच शेतकऱ्यांच्या हस्ते संपन्न झाला. हा उद्घाटन सोहळा म्हणजे शेतकऱ्याचा सन्मान सोहळा असल्याचे मत भारत लाळगे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,सर्वांत प्रथम या ध्येयावर चालणाऱ्याइंदापूर तालुक्यातील सर्वांत मोठ्या
श्री नंदिकेश्र्वर मशिनरी उद्घाटन समारंभ हा 
दि १६ नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर  सकाळी १०.०५ मिनिटांनी पर पडला. हा उद्घाटन समारंभ आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला. कोणा मान्यवरांच्या हस्ते न्हवे तर तालुक्यातील शेतकरी राजा  अर्थात सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपस्थित
श्री नवनाथ पाडुळे  कालठण,
श्री दत्ता नगरे शहा,
श्री दिलीप ठवरे गाव  वरकुटे,
श्री धनाजी फाटे  माळशिरस, 
श्री अभिमन्यू गायकवाड  सरडेवाडी,
यांचा हस्ते उद्घाटन संपन्न करण्यात आले.
त्याचबरोबर शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.
गेली ७ वर्षापासून शेतकऱ्यांसाठी सर्वांत प्रथम या ध्येयावर हा श्री नंदिकेश्र्वर मशिनरी समूह काम करत आहे.


शेती उपयोगी सर्व साहित्याचे हे इंदापूर मधील सर्वांत मोठे दालन आहे यावेळी शेतकरी यांनी प्रतिक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने देताना म्हणाले की
श्री नंदिकेश्र्वर मशिनरी या तालुक्यातील  सर्वांत मोठ्या दुकानाचा उद्घाटन समारंभ आमच्या हस्ते झाला हे आमचं भाग्यच आहे.- नवनाथ पाडुळे


माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना शेती उपयोगी दुकानाचा उद्घाटन आमच्या हस्ते करण्यात आले हे आमचे शेतकऱ्यांचे भाग्यच.हा सोहळा  आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील - अभिमन्यू गायकवाड

हे दुकानदार  शेतकऱ्यांसाठी सदैव काहीतरी नवीन मशिनरी आणत असतात. यांची सेवा तत्पर आहे. - धनाजी फाटे

कार्यक्रमास तालुक्यातील  पदाधिकारी , अधिकारी, व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
श्री भारतभाऊ लाळगे.श्री दिपक शेठ लाळगे.
चि. प्रतीक शेठ लाळगे
यांनी स्वागत करून आभार मानले.
close