shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात 19 ठिकाणी आग..!!

पुणे:-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मीपूजनाला काल नागरिकांनी केलेल्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. आगीचे प्रकार किरकोळ स्वरुपाचे असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

लक्ष्मीपूजन झाल्यानंतर काल फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. आतषबाजीमुळे वेगवेगळ्या भागात आग लागण्याच्या घटना घडल्या. छतावर साठलेला कचरा, टाकाऊ वस्तुंनी पेट घेतल्याच्या घटना घडल्या. गुरुवार पेठेतील फुलवाला चौक, सिंहगड रस्त्यावरील सनसिटी परिसरात एका घरात आग लागल्याची घटना घडली. पौड रस्त्यावरील बाबाज गार्डन हॉटेल, फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीतील गच्चीवर साठलेल्या कचऱ्याला आग लागली. येरवड्यातील गणेशनगर परिसरात कचऱ्याला आग लागली.

शहराच्या वेगवेगळ्या भागात 19 ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले. बहुतांश ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या. मध्यरात्रीपर्यंत आग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील दूरध्वनी खणाखणात होता. वेगवेगळ्या भागात लागलेली आग आटोक्यात आणताना जवानांची धावपळ उडाली.
close