अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने इंदापूर येथे पत्रकार दिन उत्साहात संपन्न..!!
इंदापूर प्रतिनिधी:(७ जाने.२१)
इंंदापुर येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये (दि.६) अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघ यांनी पत्रकार दिनआयोजित केला .
यावेळी माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील.इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे,तसेच आरोग्य व बांधकाम जिल्हा परिषद विभागाचे माजी सभापती प्रवीण माने, इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सरचिटणीस वसंतराव आरडे, ,तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.शेख, इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल ,जेष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर, अ.भा.म.पत्रकार परिषदचे पुणे जिल्हा अध्यक्ष डाँ.संदेश शहा, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे (साप्ताहिक) इंदापूर तालुका अध्यक्ष विलासराव गाढवे, जिल्हा निरिक्षक शौकतभाई तांबोळी, जिल्हा संपर्कप्रमुख काकासाहेब मांढरे,इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंदशेठ शहा, ,इंदापूर नगरसेवक अमर गाडे,पोपट शिंदे, दुर्वास शेवाळे,तुषार रंजणकर,शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी,काँग्रेस तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत, चमनभाई बागवान,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल झगडे,नगरसेवक प्रशांत शिताप,नायबतहसिलदार ठोंबरे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापुुर तालुका अध्यक्ष राजेंद्र कवडे देशमुख शहराध्यक्ष सुरेश जकाते, सचिव धनंजय कळमकर ,,खजिनदार अंगद तावरे, दिपक शिंदे, ह्युमन राइट्स जनहित मानवाधिकार पुणे जिल्हा अध्यक्ष पत्रकार कैलास पवार, , श्रेयस नलवडे, दिपक खिलारे, हमिदभाई आतार,रामदास देवकर, मल्हारी लोखंडे, तात्यासाहेब घाटे,आदम पठाण, अमोल गुरगुडे,जितेंद्र जाधव, मयूर देवकर,गरीबी निर्मुलन समितीचे इंदापूर तालुका अध्यक्ष प्रदिप पवार व इतर पत्रकार बंधूंचा सन्मान उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला या वेळी लायनेस कल्बच्या सायराभाभी आतार, कल्पना भोर,जयश्री खबाले इ.उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वृत्तपत्र (६ जानेवारी, १८३२) रोजी सुरू केल्याने त्यांच्या कार्याची आठवण राहावी यासाठी त्यांचा जन्मदिवस 'पत्रकार दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून आपल्या जीवाची पर्वा न करता देशभरात घडणा-या घटनांची माहिती,अन्याय-अत्याचार व भ्रष्टाचार अशा अनेक प्रश्नाना वाचा फोडण्याचे काम पत्रकार करित आहेत. परंतु काही असामाजिक तत्वांकडून पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत ते निंदणीय आहे. पत्रकारांच्या आरोग्य विषय कुठलीही योजना किंवा शासकीय लाभ दिला जात नाही . त्यामुळे आम्ही इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांचा तीन वर्षासाठी आरोग्य संरक्षण विमा उतरविणार अशी घोषणा करून पत्रकार दिनी इंदापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांना माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केले.
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, बांधकाम व आरोग्य माजी सभापती प्रवीण माने, इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसंतराव आरडे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम चे दरम्यान लक्ष्मी वैभव व शिवसृष्टी या सर्वगुन संपन्न दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रम मध्ये पत्रकार बंधूंना पेन, डायरी उच्चप्रतीची ऑफिसर फाईल, हार गुच्छ भेट देऊन स्नेह भोजन देऊन हा आनोका कार्यक्रम सोशलडीस्टन्स ठेवून सॅनिटायझर चा वापर करून पार पडला. .या कार्यक्रम चे सुत्रसंचालन अँँड. नारायण ढावरे यांनी केले तर आभार राजेंद्र कवडे- देशमुख यांनी मानले.
_________________________
विविध उद्देशपुर्तीसाठी संघ कार्यरत ..अध्यक्ष एम.डी.शेख
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे संस्थापक ,अध्यक्ष एम.डी.शेख यांनी सांगितले की, पत्रकारांचे संरक्षण करणे, पत्रकारांसाठी विविध योजना राबविणे, पत्रकारांच्या कुटुंबाना सहकार्य करणे,पत्रकारांवरील हल्ले थांबवणे, पत्रकारांना आरोग्यविषयक सुविधा पुरविणे, पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत करणे, पत्रकारांचे कल्याण व उत्कर्ष करणे, पत्रकार संरक्षण कायद्याची योग्य अमलबजावणी होण्यासाठी पुढाकार घेणे, पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे, पत्रकारांना येणा-या अडचणी, समस्या सोडविणे अशा विविध उद्देशपुर्तीसाठी संघ कार्यरत आहे.






