shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अ.नगर शिक्षक बॅंकेला सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व कृषी अधिकारी मेहत्रे यांची सदिच्छा भेट:

अहमदनगर : अहमदनगर प्राथमीक शिक्षक सहकारी बॅंक जिल्ह्यातील महत्वाचे समजल्या जाणार्या अग्रगण्य बॅंकेपैकी एक बॅंक आहे. या बॅंकेचे वैशिष्ट्ये म्हणजे शिक्षण क्षेत्रातील सर्व सभासदांना पतपुरवठा करणारी एकमेव अशी जिल्ह्यातील संस्था आहे. या बॅंकेला सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम गायकवाड व कृषी अधिकारी मेहेञे यांनी नुकतीच भेट दिली.

या प्रसंगी अहमदनगर शिक्षक बॅंकेचे श्रीरामपूरचे संचालक व शिक्षक नानासाहेब बडाख यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन उचित असा सन्मान केला.यावेळी शिक्षक बॅंकेविषयीच्या कामकाजा विषयीचे माहिती त्यांना  देण्यात आली. 

या कार्यक्रम प्रसंगी संचालक नानासाहेब बडाख, सुजित बनकर, राजू इनामदार, अल्ताफ शाह, पिंगळे, गायकवाड, डेंगळे व शिवाजी भालेराव आदी शिक्षक उपस्थित होते.
close