कन्नड । प्रतिनिधी :
कन्नड तालुक्यातील पुर्णा नेवपुर आज शंभर टक्के भरला असुन सांडव्यावरून पाणी वहायला लागले आहे.मध्यम प्रकल्प भरल्यामुळे वाकी,नेवपुर चिंचोली लिंबाजी, बरकतपुर,घाटशेंद्रा तळनेर ह्या परीसरातील पिण्याचा पाण्याचा व सिंचन साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न सुटल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हया वेळी वाकी गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री पुंडलिक बापू जंजाळ यांच्या हस्ते जल पुजन करण्यात आले.
यावेळी श्रीराम दादा जंजाळ, ज्ञानेश्वर पल्हाळ सरपंच वाकी , मनोज देशमुख सरपंच नेवपुर, पो.पा.शिवाजी तरळ ,विठ्ठल आणा जंजाळ तंटामुक्ती अध्यक्ष - राजू नाना पवार पंडीत गव्हांडे ,ग्रा.सदस्य श्रीराम येवले , रामेश्वर जंजाळ,आजिनाथ जेठे,बापु लोखंडे,धनराज पवार ,बाळु काळे , विलास जंजाळ , अमोल गव्हांडे, मिलिंद पवार,अक्षय मोरे इ.ग्रामस्थ उपस्थित होते.

