फिर्यादीचे वतीने नामांकित वकील व महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड .सुनिल आठरे यांचे वकीलपत्र दाखल
प्रतिनिधी- आसावरी वायकर
अ .नगर : (दि .१०) : राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार रोहीदास दातीर यांची दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी नाटयमयरीत्या अपहरण हत्या करण्यात आली होती. त्याबाबत पत्रकार रोहीदास दातीर यांचे पत्नीने राहुरी पोलीस स्टेशनमधे फिर्याद दाखल केली होती .
त्याप्रमाणे गुन्हा दाखल होउन संबंधीत आरोपींना पोलीसांनी अटक केली असुन त्यातील संशयीत आरोपी अनिल गावडे अदयाप फरार असुन पोलीसांनी सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र अहमदनगर जिल्हा न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात मयत पत्रकार दातीर यांची पत्नी व फिर्यादी सविता रोहीदास दातीर यांच्यावतीने नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार व नामांकित वकील सुनिल आठरे यांनी वकीलपत्र दाखल केले असुन सदर घटनेबाबत योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुनील आठरे यांनी सांगितले.

