shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डाळिंब जात आहेत चोरीला.. शेटफळ हवेली वडापुरी येथील शेतकरी चिंतातूर.

डाळिंब जात आहेत चोरीला.. शेटफळ हवेली वडापुरी येथील शेतकरी चिंतातूर.

फोटो: वडापुरी येथील शेतकरी डाळिंब  चोरून तोडून  नेलेले रिकामे   झाड दाखवताना.

फोटो: शेटफळ हवेली येथील शेतकरी डाळिंब चोरून तोडून नेलेले रिकामी झाड दाखवताना. 

इंदापूर प्रतिनिधी:(९ ऑगस्ट २०२१) इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली या ठिकाणच्या शेतकऱ्याचे ५० गुंठ्यात असणारी उत्तम दर्जाची तोडणीला आलेली डाळिंब रात्रीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार हरिभाऊ रामचंद्र पुंडे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन येथे  दिली तर वडापुरी येथील मोनाली शहाजी काळे या शेतकऱ्यांनी दोन एकर क्षेत्रातील काही डाळिंबाची चोरी करून कुंपणाचे नुकसान  झाल्याबद्दल ची तक्रार   दिली. या दोन्हीही डाळिंबाच्या चोरीच्या घटने मुळे शेटफळ हवेली व वडापुरी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा होत असून शेती पिकाच्या बद्दल चिंतेचे वातावरण बनले आहे.
वरील दोन्ही शेतकरी यांचे कोणाशीही वैर नाही. तरीही अशाप्रकारे हाता तोंडाला आलेले पिक रात्रीचा फायदा घेऊन चोरीला गेले .तर आत्ता या शेतकऱ्यांनी झालेला खर्च आणि घर प्रपंचाच्या कशा पद्धतीने चालवावा हा प्रश्न यांच्यासमोर पडला आहे. असाच प्रश्न या परिसरातील अनेक शेती पिके पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना ही पडला असल्याचे दिसत आहे.

अशाप्रकारे शेतीतील शेत पिके चोऱ्या करणाऱ्यावर पकडण्यासाठी कारवाई केली नाही तर शेतकरी आणि शेती याची प्रगती कशी होणार केंद्र शासन व राज्य शासन शेतकऱ्यांसाठी शेती पिके पिकवण्यासाठी विविध उपक्रमातून प्रेरित करीत असताना आशा चोर्‍या सुरू झाल्यात तर शेती करणे अवघड होईल. आज या शेतकऱ्यांनी चार पाऊल पुढे येऊन पोलीस प्रशासनास कळवले तसे ज्यांचे नुकसान झाले आहे .आणि कळवीले नाही .असे किती शेतकरी असतील याची कल्पना न करणे योग्य म्हणून शेतकऱ्यांच्या समस्यासाठी प्रशासनाने नक्कीच अशा  प्रकारांना गांभीर्याने घेऊन पाऊल  उचलणे गरजेचे आहे .अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू आहे.

चौकट: शेतकऱ्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनास कळवावे - पो. नि. धन्यकुमार गोडसे.
डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या डाळिंब चोरीच्या  चिंतेची वाढती बाब लक्षात घेता इंदापूर पोलीस प्रशासनाचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांची अशाप्रकारच्या शेती पिकांची चोरी होत असेल किंवा संबंधित चोर सापडला तर तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावे .
close