नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने इंदापूर तहसिल कार्यालय इंदापूर येथे दिले निवेदन.
कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामूळे सर्व जातीय धर्मातील लोकांना कोणत्याही नागरिकांना याची बाधा झाली तर सर्व खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत या संदर्भात दिले निवेदन.
इंदापूर : माहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना वर मोफत उपचार खाजगी हॉस्पिटल मध्ये करण्याचे शासनाने दिले आहेत. सरकारी दवाखान्यात तर मोफत उपचार होतातच , पण कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामूळे सर्व जातीय धर्मातील लोकांना कोणत्याही नागरिकांना याची बाधा झाली तर सर्व खाजगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत यासाठी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या शिष्टमंडळाने इंदापूर तहसिलदार अनिल ठोंबरे व उपविभागीय अधिकारी प्रांत बारामती दादासाहेब कांबळे यांची(दिनांक ९ ऑगस्ट) रोजी भेट घेऊन निवेदन देऊन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना वर मोफत उपचार खाजगी हॉस्पिटल मध्ये करण्याचे शासनाने दिले आहेत.पण बारामती मध्ये चार अंगीकृत दवाखाने आहेत,ज्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कोरोना वर मोफत उपचार करू शकतात व त्यांना मोफत उपचार करावेच लागतात ज्यामध्ये केशरी शिधा पत्रिका,पिवळी शिधा पत्रिका मधील लोकांना मोफत उपचार मिळतात.तो कोणत्याही जाती धर्माचा असो यांच्यावर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे, पण बारामती मधील हॉस्पिटल वाले मुजरे करतात, गरिबांची लूट करतात. गरीब जनतेकडून भरमसाठ पैसे घेत आहेत.याचे पुरावे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने तहसिलदार अनिल ठोंबरे व प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले. शासन सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून गरिबांना मोफत उपचार मिळावेत म्हणून निधी देत आहे.शासनाने पांढरी शिधा पत्रिका धारकांनाही आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार मोफत उपचार देण्याचे आदेश दिले आहेत. पण हे दवाखान्यातील लोक गरिबांना त्याचा लाभ घेऊ देत नाहीत.तरी या दवाखान्यावरती तत्काळ कारवाई करावी.अन्यथा तहसिल कार्यालयापुढे १५ ऑगस्ट रोजी झेंडा वंदन करू देणार नाही असा इशारा नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटनेच्या वतीने तहसिलदार इंदापूर व प्रांत अधिकारी बारामती यांना देण्यात आला.तरी सामान्य नागरिकांना हे मोफत उपचार दवाखान्यात मिळत नसतील तर नागरिकांनी तहसिलदार इंदापूर , बारामती व प्रांत अधिकारी बारामती यांच्याकडे लेखी तक्रारी कराव्यात म्हणजे सामान्य नागरिकांना उपचार मोफत मिळतील. निवेदन देताना उपस्थित नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस महाराष्ट्र राज्य सचिव वैभव तानाजी गीते इंदापूर तालुका अध्यक्ष वैभव तानाजी धाईंजे, इंदापूर तालुका उपाध्यक्ष शिवाजी गोविंद बनसोडे, इंदापूर तालुका सदस्य अतुल बनसोडे, पंढरपूर तालुका सदस्य बबन नवगिरे, इंदापूर तालुका सदस्य युवराज गायकवाड, प्रणव भागवत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

