चांगली  मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार  आपण सगळ्यांनी स्वागत करा.. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे 
इंदापूर प्रतिनिधी: (दि.४ सप्टेंबर २०२१)राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते जोडो अभियानांतर्गत अनेक मोठमोठे  खूप कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. आणि चांगली  मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. त्याचा आपण सगळ्यांनी स्वागत करा. असे आव्हान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी भव्य युवक काँग्रेस मेळाव्यात कार्यकर्त्यांना बोलताना इंदापूर मधील शहा सांस्कृतिक भवन येथे (दि. ४ सप्टेंबर) रोजी व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकाळ,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,कार्याध्यक्ष अतुल झगडे, वरिष्ट उपाध्यक्ष शिवाजीर पाणसरे,युवक तालुकाध्यक्ष अँड. शुभम निंबाळकर,कार्याध्यक्ष सचिन खामगळ, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर,कार्याध्यक्ष मयुर ढावरे, वसिमभाई बागवान आदी उपस्थित होते.

राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले की, 
निवडणूक लागल्यानंतर युवकांची ताकद काय ते आपल्याला समजते.  ज्यांच्याकडे युवक वर्ग जास्त असतो. त्यांचा विजय निश्चित असतो. प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर युवकांची संघटना असली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब जनतेची कामे करता येतात. शेतकरी, कामगार, गोरगरिबांच्या, उद्योगपती ,शेतमजूर या सर्वांचा नेता सगळ्यांसाठी सहकार्य करणारा मदत करणारा नेता म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे या सगळ्यांची आपल्या सर्वांना मदत करण्याची भूमिका असते.

 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम युवक काँग्रेसच्या माध्यमातून घराघरात पोहचले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे तुम्हाला सर्व युवकांना  सहकार्याची भूमिका राहणार आहे. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरचा  हंडा कसा उतरवता येईल .इंदापूर तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या घरात नळ कनेक्शन कसं नेहता येईल. त्यासाठी त्या कामांची मंजुरी दिली आहे .बावीस गावाचा आणि काही गावांचा शेतीच्या पाणी संदर्भात पाणीपुरवठा कसा करता येईल. नदीमध्ये सतत पाणी कसे साठवून ठेवता येईल. तसेच नवीन एखादी धरणाची साईट सापडते का? कुठेतरी पाणी मिळते का? आज इंदापूरचा आमदार आणि मंत्रीपद मिरवायसाठी नाही. माझ्या इंदापूरच्या जनतेला पाणी कसे मिळेल हे प्रामाणिकपणे काम  करायचे आहे. यासाठी याकाळात शंभर वर्षाचा विकास करून इंदापूर तालुक्याचा विकासाचा कायापालट करीन. आदरणीय शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून जे काय देता येईल ते देईन.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ते जोडो अभियानांतर्गत अनेक मोठमोठे  खूप कार्यकर्ते आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आहेत. आणि चांगली  मोठे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत. त्याचा आपण सगळ्यांनी स्वागत करा. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपरिषदच्या निवडणुकीत  राष्ट्रवादी काँग्रेसचाच पक्षाचा झेंडा फडकेल
  यासाठी सगळ्यांनी  गट-तट विसरून प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यांनी खोडी केली त्यांनी खोडी केली या प्रकारात ओडा ओडी होईल यापेक्षा त्याने लूज भूमिका घेतली तर तुम्ही डबल लूज भूमिका घ्यावे या शास्त्रानुसार आपण काम करा अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केले.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर तालुक्यातील विविध विकास कामांचा पाढा वाचला.तालुक्यात किती वेगाने विकास कामे सुरू आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली.असे सांगताना ते म्हणाले हे सर्व करतोय म्हणून तुम्हा समोर वाजवतोय. काहीजण काहीच न करता खूप काही वाजवत असतात असाही टोमणा त्यांनी विरोधकांना नाव न घेता लगावला.


 
यावेळी युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख म्हणाले की,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा वाहते आहे. राज्यमंत्री भरणे राज्याचे नेतृत्व करत असताना विशेषकरून इंदापूरच्या विकासाकडे त्यांचं लक्ष आहे. पक्षप्रमुख शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी त्यांनी इंदापूर साठी आणला आहे. इंदापूर तालुका हा बारामतीच्या शेजारी आहे. मात्र विकासाच्या बाबतीत तो आता बारामती पेक्षा कमी राहणार नाही अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

यावेळी जिल्हाध्यक्ष गारकर म्हणाले की, पक्षाने अनेक युवकांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी एक नामी संधी दिली आहे. या संधीचा युवकांनी समाजहिताठी वापर करावा. सर्वांनी एक दिलाने काम करून पक्षाला बळकटी द्यावी.